TRENDING:

विदर्भ स्पेशल, हिवाळ्यात बनवा पाण्यातील गोळे, एकदा खाल तर पुन्हा कराल

Last Updated:
विदर्भ अनेक झणझणीत पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातील एक म्हणजे पाण्यातील गोळे. हा पदार्थ घरगुती साहित्यापासून बनणारा आहे. तुम्ही कमीत कमी वेळात चटपटीत असे पाण्यातील गोळे बनवू शकता.
advertisement
1/7
विदर्भ स्पेशल, हिवाळ्यात बनवा पाण्यातील गोळे, एकदा खाल तर पुन्हा कराल
विदर्भामध्ये हिवाळ्यात कढी गोळे हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पाण्यातील गोळे सुद्धा तितक्याच आवडीने बनवले जातात. हिवाळा सुरू झाला की पाण्यातील गोळे आणि भाकरी हा पदार्थ विदर्भात हमखास केला जातो.
advertisement
2/7
पाण्यातील गोळे हा पदार्थ कसा बनवायचा? याचीच रेसिपी आपल्याला अमरावतीमधील गृहिणी सारिका पापडकर यांनी सांगितली आहे.
advertisement
3/7
पाण्यातील कडी गोळे बनवण्यासाठी 1 वाटी तुरीची डाळ, चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरचीचा ठेचा, कडीपत्ता, कोंथिबीर, लाल तिखट, हळद, धनी पावडर, मीठ, तेल, जिरे हे साहित्य लागेल.
advertisement
4/7
सर्वात आधी तुरीची डाळ 2 ते 3 तास भिजत घालायची. त्यानंतर मिक्सर मधून बारीक करून घ्यायची. त्यानंतर कढई गॅसवर ठेवायची आणि त्यात तेल घालायचे. त्यांनतर जिरे आणि कांदा घालायचा. कांदा लाल होऊ द्यायचा आणि त्यात लाल तिखट आणि इतर मसाले घालावे. ते थोडे शिजून घ्यायचे. त्यानंतर टोमॅटो घालायचे आणि ते शिजवून घ्यायचे. त्यात कडीपत्ता सुद्धा घालू शकता.
advertisement
5/7
त्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढे पाणी घालायचे आणि रस्सा बनवून घ्यायचा. त्यानंतर त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची. तो पर्यंत गोळ्याचे सारण तयार करून घ्यायचे. बारीक करून घेतलेल्या डाळीमध्ये जिरे, कडीपत्ता, हिरवी मिरचीचा ठेचा, मीठ हळद घालून घ्यायचं.
advertisement
6/7
त्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं. त्यात तुम्ही गोळे घट्ट होण्यासाठी पीठ किंवा बेसन घालू शकता. आता ते व्यवस्थित मिक्स करून त्याचे गोळे तयार करून घ्यायचे.
advertisement
7/7
पाण्याला उकळी आली असेल तर त्यात गोळे सोडायचे. गोळे शिजतपर्यंत त्यात चमचा टाकायचा नाही. जेव्हा गोळे वर येतात तेव्हा ते शिजले म्हणून समजायचे. त्यानंतर त्यात कोथिंबीर घालून घ्यायची. पाण्यात गोळे तयार होतील. घरगुती साहित्यापासून अगदी सोपी रेसिपी तुम्ही बनवू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
विदर्भ स्पेशल, हिवाळ्यात बनवा पाण्यातील गोळे, एकदा खाल तर पुन्हा कराल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल