TRENDING:

मराठी मुलगी कशी झाली मोमोज गर्ल? स्वरांगी ठरतेय अनेकांसाठी प्रेरणा

Last Updated:
भायखळ्याची मोमोजवाली स्वरांगी कासारे रोज घरातून निघताना शिवरायांची मूर्ती घेऊन निघते.
advertisement
1/7
मराठी मुलगी कशी झाली मोमोज गर्ल? स्वरांगी ठरतेय अनेकांसाठी प्रेरणा
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. शिवरायांच्याच प्रेरणेतून <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईतील</a> भायखळ्याची एक मराठमोळी तरुणी यशस्वी उद्योजक बनलीय. भायखळ्याची मोमोजवाली म्हणून ती अनेकांसाठी प्रेरणा बनतेय.
advertisement
2/7
सर्वजण छोटे-मोठे व्यावसाय करतात मग मुलींनी का मागे राहावं? हाच प्रश्न मनात धरून ही मुलगी जिद्दीन व्यवसायात उतरली आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
advertisement
3/7
या भायखळ्याच्या मोमोजवालीचं नाव स्वरांगी अनिश कासारे असं आहे. भायखळा पश्चिम येथे एन.एम. जोशी रोडवरील विहंग इमारतीच्याखाली स्वरांगीचा मोमोजचा स्टॉल आहे.
advertisement
4/7
छत्रपती शिवरायांना स्वरांगी खूप मानते. त्यामुळे रोज घरातून निघताना ती महाराजांची मूर्ती सोबत घेऊन निघते. &quot;महाराजांमुळे मला प्रेरणा मिळते. म्हणून मी महाराजांची मूर्ती नेहमी स्टॉलवर ठेवते,&quot; असं स्वरांगीनं म्हटलंय. संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत ती विविध पदार्थांचा स्टॉल लावते. या ठिकाणी खवय्यांची मोठी गर्दी असते.
advertisement
5/7
लॉकडाऊनमध्ये सुचलेल्या या कल्पनेनं स्वरांगीला एक नवीनच ओळख मिळवून दिली. पण चांगलं शिक्षण झालेलं असतानाही व्यवसायात उतरण्याचा निर्णय या 'मोमज गर्ल'ने घेतला.
advertisement
6/7
नोकरी करण्यापेक्षा स्वत:चं असं काहीतरी सुरु करावं या विचाराने स्वरांगीने मोमोजचा स्टॉल टाकण्याचा निर्णय घेतला आणि एक यशस्वी व्यावसायिक होण्याचं स्वप्न घेऊन या मार्गानं निघाली. आता ती मोमोज विक्रीतून चांगला नफा मिळवत आहे.
advertisement
7/7
एक मुलगी जेव्हा व्यावसायिक होण्याचा मार्ग निवडते तेव्हा तिला कोणीतरी बळ देण्याची गरज असते. स्वप्रेरणेनं हा व्यवसाय सुरू केला. तसेच ती न डगमगता व्यवसायत पुढे जात आहे. तिची जिद्द आणि चिकाटी ही व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी प्रेरणादायी आहे. (मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
मराठी मुलगी कशी झाली मोमोज गर्ल? स्वरांगी ठरतेय अनेकांसाठी प्रेरणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल