पुण्यातली 169 वर्षे जुनी बेकरी, नवसासाठी बनवला ‘हा’ पदार्थ, आता जगभरातून डिमांड
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Pune Food: अगदी 1857 साली सुरू झालेल्या या बेकरीने आजही जुन्या पद्धतीची चव आणि परंपरा कायम ठेवली आहे.
advertisement
1/7

पुणे हे ऐतिहासिक शहर असून इथली खाद्य संस्कृतीचं देखील जगाला आकर्षण आहे. त्यामुळेच पुणेकर आजही पारंपरिक खाद्य संस्कृती जपताना दिसतात. यातलंच एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे रविवार पेठ आणि गणेश पेठ परिसरातील सुमारे 169 वर्षांची परंपरा असलेली खास ‘रोट’ बेकरी होय.
advertisement
2/7
अगदी 1857 साली सुरू झालेल्या या बेकरीने आजही जुन्या पद्धतीची चव आणि परंपरा कायम ठेवली आहे. विशेषतः रव्यापासून तयार होणारी गोड, सुगंधी रोट ही या बेकरीची ओळख बनली आहे. या पारंपरिक रोटमध्ये रवा, साखर , तूप, वेलची, खसखस, काजू, बदाम यांसारख्या ड्रायफ्रूट्सचे मिश्रण वापरले जाते.
advertisement
3/7
या रोटमध्ये दूध आणि खव्याचाही वापर केला जातो. त्यामुळे या पदार्थाला एक वेगळीच पौष्टिकता आणि चव मिळते. एक रोट साधारणपणे 50 रुपयांना मिळतो. तरीही ग्राहक मोठ्या प्रमाणात रोट बनवून घेतात. साध्या रोटचा दर सुमारे 600 रुपये डझन असून स्पेशल रोट 960 रुपये डझन या दरात मिळतात.
advertisement
4/7
सध्या पाचवी ते सहावी पिढी ही प्रसिद्ध रोट बेकरी सांभाळत आहे. घरातील बहुतांश सदस्य या व्यवसायात कार्यरत असून सुमारे 20 कामगारही काम करतात. विशेष म्हणजे ग्राहक स्वतःचे साहित्य घेऊन आल्यास त्यांच्यासाठी रोट बनवून देण्याची परंपराही येथे कायम आहे.
advertisement
5/7
मोहर्मच्या काळात नवस म्हणून रोट बनवण्याची परंपरा येथे सुरू झाल्याचं सांगितलं जातं. सुरुवातीला केवळ दोन महिनेच भट्टी सुरू असायची. मात्र 1990 ते 1995 दरम्यान हळूहळू मागणी वाढत गेली. आता वर्षभर म्हणजेच बारा महिने ही बेकरी सुरू असते. रोज 50 ते 100 किलोपर्यंत रोट बनवून नेणारे ग्राहक इथं असतात.
advertisement
6/7
या बेकरीची चव महाराष्ट्रासह देशाबाहेरही पोहोचली आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई आणि अगदी सौदी अरेबिया येथेही लोक रोट मागवतात. विशेष म्हणजे अनेक मान्यवरांनीही या रोटची चव चाखली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ते अगदी अजित पवार यांना देखील इथले रोट आवडायचे असं सांगितलं जातं. प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार देखील रोट घेऊन जात असल्याचं रफिक शेख सांगतात.
advertisement
7/7
दरम्यान, पुण्याच्या प्रसिद्ध खाद्य संस्कृतीचा वारसा जपण्याचं काम ही रोट बेकरी आजही करत आहे. बदलत्या काळात शहरात अनेक बेकरी सुरू झाल्या. परंतु, पारंपरिक ‘रोट’ बेकरीची चव आज देखील जगभरातील पुणेकर आणि खाद्य प्रेमींना भुरळ घालते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
पुण्यातली 169 वर्षे जुनी बेकरी, नवसासाठी बनवला ‘हा’ पदार्थ, आता जगभरातून डिमांड