TRENDING:

पावसाळ्यात कोणती फळं खावी? हेल्थी आरोग्यासाठी पूर्ण यादी

Last Updated:
आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ आवर्जून देतात. फळांमधून शरिराला भरपूर जीवनसत्त्व आणि पौष्टिक तत्त्व मिळतात. त्यात हंगामी फळं खाल्ली तर उत्तमच. (मनीष पुरी, प्रतिनिधी)
advertisement
1/7
पावसाळ्यात कोणती फळं खावी? हेल्थी आरोग्यासाठी पूर्ण यादी
पावसाळा येताच बाजारात रंगीबेरंगी फळं दिसू लागतात. काही फळं बघताच तोंडाला पाणी सुटतं, मात्र आपल्याला त्यांची नावं माहिती नसतात म्हणून आपण ती फळं खरेदी करत नाही. त्यामुळे आज आपण पावसाळ्यात प्रामुख्यानं बाजारात दिसणाऱ्या सर्व फळांबाबत जाणून घेणार आहोत.
advertisement
2/7
पेर : हे फळ पोटाच्या विकारांवर रामबाण असतं. दररोज पेर खाल्ल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर सुदृढ राहतं.
advertisement
3/7
डाळिंब : या फळात आयर्न आणि व्हिटॅमिनचं प्रमाण भरपूर असतं. रक्तवाढीसाठी हे फळ फायदेशीर ठरतं. दररोज 1 डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
4/7
आलू बुखारा : या फळात व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K आणि कॉपर, फायबर, पोटॅशियमसह विविध पोषक तत्त्व भरभरून असतात. त्यामुळे आजारपण दूर राहतं. या फळामुळेही रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते.
advertisement
5/7
जांभूळ : अतिशय चवदार असलेली ही फळं शुगर पेशंटसाठी उत्तम मानली जातात. यात व्हिटॅमिन C, फायबर आणि आयर्न भरपूर असतं.
advertisement
6/7
लिची : हे फळ चवीला स्वादिष्ट असतंच, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. यात असलेल्या पौष्टिक तत्त्वांमुळे <a href="https://news18marathi.com/lifestyle/food/bhakri-or-chapati-for-weight-loss-mnkj-mhij-1219615.html">पचनसंस्था उत्तम राहते</a>. <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/food/oil-or-ghee-what-is-healthier-choice-l18w-mhij-1219623.html">श्वास घ्यायला होणारा त्रास</a>ही यामुळे कमी होतो.
advertisement
7/7
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/food/steel-vs-nonstick-which-utensils-are-better-for-you-l18w-mhij-1219848.html">आहाराबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांशी चर्चा करावी. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
पावसाळ्यात कोणती फळं खावी? हेल्थी आरोग्यासाठी पूर्ण यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल