नोकरी गेल्यामुळे इंजिनिअर महिलेनं सुरू केला बिस्किटांचा ब्रँड; 14 प्रकारामधून आता लाखोंची कमाई
- Published by:News18 Marathi
Last Updated:
इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असणाऱ्या मेघा कुंभार यांची कोरोना काळात नोकरी गेली. विविध 14 प्रकारच्या बिस्कीटांची निर्मिती त्यांनी आता सुरू केली आहे.
advertisement
1/6

एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागं स्त्री असते, असं म्हटलं जातं. पण एखादा पुरुष स्त्रीच्या मागं खंबीरपणे उभा राहिला तर काय घडू शकतं याचा प्रत्यय साताऱ्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असणाऱ्या क्षेत्र माऊली येथील मेघा कुंभार यांची कोरोना काळात नोकरी गेली. तेव्हा पती धनंजय कुंभार यांनी पत्नीला पौष्टिक बिस्कीट बनवण्याच्या उद्योगासाठी साथ दिली. 14 प्रकारचे बिस्कीट बनवत ‘दिव्यांक कुकीज’ या ब्रँडच्या माध्यमातून कुंभार दाम्पत्य लाखोंची कमाई करत आहे.
advertisement
2/6
कोरोना लॉकडाऊनच्या काळात कुंभार दाम्यत्याची नोकरी गेली. तेव्हा मेघा कुंभार यांनी पतीसह स्वत:चा व्यवसाय करण्याचा निर्धार केला. विविध 14 प्रकारच्या बिस्कीटांची निर्मिती सुरू केली. या पौष्टिक बिस्कीटांना मागणी वाढल्याने दिव्यांक कुकीज हा बिस्कीटांचा ब्रँड बनला आहे.
advertisement
3/6
गव्हाचे बिस्किट, नाचणीचे बिस्किट, ओट्स बिस्किट, तृणधान्य बिस्कीट असे विविध प्रकारचे बिस्कीट बनवतात. तसेच नाचणी, ज्वारी, बाजरी, राजगिऱ्याचे, जीराचे, त्याचबरोबर डायट बिस्किटही बनवली जातात. ज्या व्यक्तींना शुगर बीपीचा त्रास होतो, जे लोक जास्त गोड खाऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठीही खास बिस्किटांची निर्मिती केली जाते. हे बिस्किट सेंद्रिय गूळ, तूप आणि गव्हापासून बनवले जातात. विशेष म्हणजे बिस्किटात एक टक्केही मैदा वापरला जात नाही, असे मेघा कुंभार सांगतात.
advertisement
4/6
नाचणीचे पीठ, गव्हाचे पीठ, सेंद्रिय गुळ,तूप, दूध, कस्टिंग पावडर, वेलची पावडर, मीठ आदी वस्तूंचा वापर करून उद्योजिका मेघा कुंभार पौष्टिक बिस्किट बनवत असतात. हे बिस्कीट पूर्णपणे सोनाली सातारा येथून न्यूट्रिशन व्हॅल्यू टेस्ट करून घेतले आहेत. गव्हाचे बिस्किट दीड महिना तर मिलेट कुकीज 4 महिने खाता येते.
advertisement
5/6
14 प्रकाराचे बिस्कीट पूर्णपणे मैदा विरहित पौष्टिक आहेत. 100 ग्रॅम गव्हाच्या बिस्किटाला 30 रुपये दर, तर 100 ग्रॅम मिल्क कुकीजला 70 रुपये दर आहे. त्याचबरोबर 300 रुपये किलो ते 700 रुपये किलो पर्यंत या बिस्किटांची विक्री केली जाते. महिन्याला 150 ते 200 किलो बिस्किटांची विक्री करून तब्बल वार्षिक 6 लाख रुपये पर्यंत नफा ते मिळवत असतात. दर महिन्याला सर्व खर्च वगळता 40 हजार रुपये मिळतात, असे देखील उद्योजिका मेघा कुंभार यांनी सांगितलं आहे.
advertisement
6/6
कुंभार यांनी बनवलेल्या बिस्किटांची सातारा,पुणे, मुंबई, केरळ, गुजरात, गोवा, नागपूर, मडगाव या ठिकाणी विक्री केली जाते. त्याचबरोबर उमेद अभियान अंतर्गत सरस महोत्सव, गोवा सरस 2022, महालक्ष्मी सरस मुंबई 2023, उमेद अभियानांतर्गत जिल्हा अंतर्गत सर्व स्टॉल, त्याचबरोबर पुणे- मुंबई येथे मिलेट फेस्टिवल देखील मेगा कुंभार यांनी केले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
नोकरी गेल्यामुळे इंजिनिअर महिलेनं सुरू केला बिस्किटांचा ब्रँड; 14 प्रकारामधून आता लाखोंची कमाई