याच प्राण्याचं दूध असतं सर्वात पौष्टिक, पण त्यासाठी पाहावी लागते बरीच वाट!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
जन्मानंतरच्या दोन तासांत बाळाला हे दूध पाजल्यास ते पूर्णपणे सुदृढ राहतं. कारण या दुधात हॉर्मोन्स विकसित होणारे पोषक तत्त्व असतात.
advertisement
1/5

गायीच्या पहिल्या दुधापासून तयार केलं जाणारं खरवस शरिरासाठी अत्यंत उपयुक्त असतं. त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्त्व मिळतात. विशेष म्हणजे पचनशक्ती मजबूत होते.
advertisement
2/5
शास्त्रज्ज्ञ डॉ. विद्या गुप्ता सांगतात की, गाय किंवा म्हशीच्या पहिल्या दुधापासून खरवस बनवलं जातं. सर्वसामान्य दुधापेक्षा या दुधात प्रोटिन्स 4 ते 5 पटीने जास्त असतात. शिवाय यातून 10 ते 15 पटीने जास्त व्हिटॅमिन ए मिळतं. शरिरात हॉर्मोन्स विकसित होण्यासाठी आवश्यक असणारे सर्व पोषक तत्त्व खरवसमधून मिळतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वाढते.
advertisement
3/5
गायीचं किंवा म्हशीचं दूध आपण एकदातरी प्यायलंच असेल. कित्येकजणांच्या आहारात दररोज दुधाचा समावेश असतो. दुधामुळे शरिराला भरपूर प्रोटिन्स मिळतात हे खरं आहे. परंतु सर्वाधिक पौष्टिक असतं ते गायीला वासरू झाल्यावर आणि म्हशीला रेडकू झाल्यावर येणारं तिचं पहिलं दूध. त्यात प्रचंड प्रोटिन्स आणि मॅग्नेशियम असतात. तसंच त्यात असलेल्या लेक्टोफेरिन तत्त्वामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
advertisement
4/5
खरवसामुळे शरिरातली इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते. त्यात असे तत्त्व असतात ज्यामुळे साखरेची पातळीही कमी होते. म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी साखर न घालता खरवस खाल्ल्यास त्यांच्यासाठी ते अत्यंत फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
5/5
जन्मानंतरच्या दोन तासांत बाळाला गायीचं किंवा म्हशीचं पहिलं दूध पाजल्यास ते पूर्णपणे सुदृढ राहतं. कारण या दुधात हॉर्मोन्स विकसित होणारे पोषक तत्त्व असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे बाळाला कोणता आजार होत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
याच प्राण्याचं दूध असतं सर्वात पौष्टिक, पण त्यासाठी पाहावी लागते बरीच वाट!