आठवड्याप्रमाणे रोज वेगळी थाळी, पुण्यात 93 वर्ष जुनं बोर्डिंग, तुम्ही कधी चाखलीय इथल्या जेवणाची चव?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुण्यातील टिळक रोड येथील बादशाही बोर्डिंग हाऊस असून याची सुरुवात 1932 साली झाली असून सात्विक पद्धतीने बनवलेलं जेवण देतात. आठवड्याप्रमाणे रोज जेवणाची थाळी असून खवय्यांची मोठी गर्दी ही इथे असते.
advertisement
1/7

पुणे शहराला अगदी ब्रिटीश कालीन इतिहास असलेली जुनी उपहारगृहांची परंपरा आहे. पुण्यातील टिळक रोड येथील बादशाही बोर्डिंग हाऊस असून याची सुरुवात 1932 साली झाली असून सात्विक पद्धतीने बनवलेलं जेवण देतात. आठवड्याप्रमाणे रोज जेवणाची थाळी असून खवय्यांची मोठी गर्दी ही इथे असते.
advertisement
2/7
मोघे यांनी सुरुवात करून 1962 नंतर हॉटेल न्यू रिफ्रेशमेंट बादशाही हे दत्तात्रय सहस्त्रबुद्धे यांनी पुढे सुरू ठेवत आज तिसरी पिढी काम करत आहे. उपवास पदार्थ, घावण, थालपीठ, मटार पॅटीस, कोथिंबीर वडी आणि इतर काही चविष्ट कोकणी पदार्थ इथे खायला मिळतात.
advertisement
3/7
प्रामुख्याने कोकणी बेस पदार्थ हे बनवले जात असून यामध्ये ओलं खोबरं, कोकणी मसाले ही टाकले जातात. मिसळ देखील बनवली जाते परंतु ती कोकणी पद्धतीने बनवली जाते.
advertisement
4/7
दडपे पोहे, भाजणीचे वडे तर कोकणी थाळीमध्ये गावरान थाळी, कोकणी थाळी, घावण थाळी अशा 10 ते 12 प्रकारच्या थाळी या सुरू केल्या आहेत.
advertisement
5/7
इतर पदार्थांची किंमत ही 50 रुपयांपासून ते 200 रुपयापर्यंत आहे. थाळी ही 190 ते 300 रुपये आहे. थाळीमध्ये दोन भाज्या, पोळी आणि गावरान थाळीमध्ये पिठलं, भाकरी, शिरा, रायता आणि ताक हे सगळे पदार्थ पहिला मिळतात.
advertisement
6/7
पुण्यासारख्या ठिकाणी देखील लोकांना कोकणी पदार्थ खाता यावे यासाठी ही सुरुवात केली. काही वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ हे इथे बनवले जातात.
advertisement
7/7
वेगळी चव असल्यामुळे लांबून लोक इथे खायला येतात. तसेच जुने उपहारगृह ही पहिला मिळत, अशी माहिती मेधा सहस्त्रबुद्धे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
आठवड्याप्रमाणे रोज वेगळी थाळी, पुण्यात 93 वर्ष जुनं बोर्डिंग, तुम्ही कधी चाखलीय इथल्या जेवणाची चव?