फळं खरेदी करण्यापूर्वी त्यावरील Sticker व्यवस्थित पाहा! थेट आरोग्याशी असतो संबंध
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
फळांवर स्टिकर्स असतात हे आपल्यापैकी बऱ्याचजणांना माहित असेल. विशेषतः सफरचंदावर स्टिकर असतं. आपण फळं धुवताना किंवा कापताना हे स्टिकर काढून फेकतो. पण या स्टिकरवर नेमकं काय लिहिलेलं असतं ते तुम्ही कधी वाचलंय का? पुढच्या वेळी फळं खरेदी करताना हे स्टिकर व्यवस्थित वाचा, कारण त्याचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी असतो.
advertisement
1/5

तुम्ही निरीक्षण केलं असेल तर स्टिकर लावलेली फळं चमकतात आणि उत्तम दर्जाची वाटतात. झारखंडमधील गुमलाचे खाद्य सुरक्षा अधिकारी लव्ह कुमार गुप्ता सांगतात की, फळांवर कंपनीकडून स्टिकर लावले जातात. या स्टिकरमध्ये ब्रॅण्डिंग आणि कोडिंग केलेलं असतं. स्टिकर लावलेल्या फळांची क्वालिटी उत्तम असते आणि म्हणूनच ही फळं महाग मिळतात. सफरचंदासह संत्र, डाळिंब, पपई, चिकू आणि चेरीवरही स्टिकर पाहायला मिळतात.
advertisement
2/5
महागड्या फळांवर ब्रॅण्डिंगच्या उद्देशानेही स्टिकर्स लावलेले असतात. काही फळांवरील स्टिकर्सवर अंक लिहिलेले असतात. ही संख्या 4 किंवा 5 अंकी असू शकते.
advertisement
3/5
जर एखाद्या फळावरच्या स्टिकरवर 5 अंक लिहिलेले असतील आणि त्यातला पहिला अंक 9 असेल तर त्या कोडचा अर्थ असा होतो की हे फळ जैविक पद्धतीनं उत्पादित केलंय.
advertisement
4/5
जर फळांवरच्या स्टिकरमध्ये 4 अंकी संख्या असेल, तर या कोडिंगचा अर्थ असतो की हे फळ किटकनाशकं आणि रासायनिक औषधांच्या मदतीनं उत्पादित केलंय. ही फळं जैविक पद्धतीनं उत्पादित केलेल्या फळांच्या तुलनेत स्वस्त आणि कमी <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/monsoon-health-tips-this-5-foods-must-be-avoid-with-tea-worst-food-combination-chai-pakoda-mhpp-1197282.html">फायदेशीर</a> असतात.
advertisement
5/5
ज्या फळांवर कोणतंही स्टिकर नसतं, त्या फळांचं <a href="https://news18marathi.com/lifestyle/food/khoya-prices-decrease-and-businesses-are-at-loss-masd-1197306.html">उत्पादन</a> सर्वसामान्य पद्धतीनं घेतलेलं असतं. शिवाय यातही कीटकनाशकं आणि रसायनांचा वापर केलेला असतो. त्यामुळे आतापासून स्टिकर पाहूनच फळं <a href="https://news18marathi.com/photogallery/money/agriculture/5-best-breeds-of-cow-farmers-can-become-rich-from-their-milk-l18w-mhij-1197271.html">खरेदी</a> करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
फळं खरेदी करण्यापूर्वी त्यावरील Sticker व्यवस्थित पाहा! थेट आरोग्याशी असतो संबंध