TRENDING:

Famous Lassi : दादरमध्ये इथं मिळते पारंपरिक प्रसिद्ध लस्सी, लोकांच्या लागतात रांगा

Last Updated:
मुंबईतील दादर हा खाद्यप्रेमींसाठी एक हॉटस्पॉट मानला जातो. या लस्सीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ती फक्त दही आणि साखरेपासून तयार केली जाते.
advertisement
1/5
दादरमध्ये इथं मिळते पारंपरिक प्रसिद्ध लस्सी, लोकांच्या लागतात रांगा
मुंबईतील दादर हा खाद्यप्रेमींसाठी एक हॉटस्पॉट मानला जातो. वडापाव, मिसळपासून ते दर्जेदार मिठाईपर्यंत सर्व काही इथे मिळतं. मात्र या सर्वामधून एक गोष्ट कायम उठून दिसते ती म्हणजे इथली लस्सीची ठिकाणं. विशेषतः दोन ठिकाणांची नावं आजही तितकीच प्रसिद्ध आहेत श्री कृष्ण लस्सी आणि कैलास लस्सी.
advertisement
2/5
90 वर्षांची परंपरा जपणारं ठिकाण दादर पश्चिमेतील राणडे रोडवर, नक्षत्र मॉलच्या समोर असलेल्या श्री कृष्ण लस्सी या दुकानाला तब्बल 90 वर्षांची परंपरा लाभली आहे. इथं सध्या या कुटुंबातील तिसरी पिढी व्यवसाय सांभाळते. या लस्सीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ती फक्त दही आणि साखरेपासून तयार केली जाते. त्यात कोणतेही फ्लेवरिंग एजंट्स किंवा प्रिझर्वेटिव्ह्ज वापरले जात नाहीत.
advertisement
3/5
त्यांच्या फुल लस्सीवर सजलेली जाडसर मलाई हीच त्यांची खरी यूएसपी (विशेषता) आहे. ही लस्सी एकदम फ्रेश तयार केली जाते आणि त्याची किंमत फक्त 50 रुपये आहे. चव, पारंपरिकता आणि दर्जा यामुळे आजही हे दुकान लस्सीप्रेमींचं आवडतं ठिकाण आहे.
advertisement
4/5
मुंबईच्या रस्त्यांवर 1970 च्या दशकापासून दादरमध्ये कार्यरत असलेली कैलास लस्सी ही दुसरी अशी जागा आहे जिथं लस्सीचा खरा पंजाबी अनुभव मिळतो. इथली लस्सी जाडसर, गोडसर आणि मलईदार असते. केवळ पारंपरिक पंजाबी लस्सीच नाही तर आंबा लस्सी आणि सुकामेवा लस्सीसारख्या फ्लेवर्ड प्रकारांमुळे देखील इथे नेहमीच गर्दी असते.
advertisement
5/5
या ठिकाणी लस्सी हँडब्लेंडेड पद्धतीने केली जाते, त्यामुळे तिचा टेक्सचर आणि टेस्ट दोन्ही इतरांपेक्षा वेगळा वाटतो. उन्हाळ्याच्या दिवसांत हे ठिकाण दादरमधील थंडावा देणारं लोकप्रिय डेस्टिनेशन बनतं. तर मग पुढच्या वेळेस दादरमध्ये गेलात, तर या दोन लस्सी स्पॉट्सना भेट देणं विसरू नका. फक्त चवच नव्हे, तर इथं एक परंपरा आणि अनुभवही तुमच्या ग्लासमध्ये ओतलेला असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Famous Lassi : दादरमध्ये इथं मिळते पारंपरिक प्रसिद्ध लस्सी, लोकांच्या लागतात रांगा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल