कलिंगड गोड आहे की नाही, एका सेकंदात ओळखू शकता, कापायची गरज नाही! भन्नाट ट्रिक
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
मार्च महिन्यात सर्वत्र रखरखीत ऊन पडतं, हळूहळू उकडायला लागतं. या दिवसांमध्ये बाजारात हिरवेगार कलिंगड दिसतात, त्यांना विशेष मागणी असते. कलिंगड चवीला स्वादिष्ट लागतंच शिवाय आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतं. त्यात व्हिटॅमिन सी आणि एसह भरभरून खनिजं असतात. कलिंगड डोळे, त्वचा आणि हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. शिवाय उन्हाच्या झळांमध्ये कलिंगड खाल्लं की जीवाला जरा हायसं वाटतं. (सिमरन जित सिंग)
advertisement
1/5

आपण खूप हौशीनं कलिंगड विकत घेतो. ते कधी कापतोय आणि कधी खातोय असं आपल्याला होतं. मात्र जर कलिंगड कापल्यावर गोड निघालं नाही तर मात्र मूडच जातो. परंतु काळजी करू नका, आज आपण कलिंगड कापण्याआधीच ते गोड आहे की नाही हे तपासण्याची एक भन्नाट ट्रिक पाहणार आहोत.
advertisement
2/5
डॉ. पुनीत कुमार पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कलिंगडावर बोटांनी वाजवून आपण ते नैसर्गिकरित्या पिकवलेलं आहे की केमिकलयुक्त आहे याचा अंदाज लावू शकतो. बहुतेकवेळा कलिंगडातून आवाज आला तर ते आतून गोडच असतं.
advertisement
3/5
आपण कलिंगडाच्या सालीवरून ते नैसर्गिक आहे की केमिकलयुक्त आहे याचा अंदाज लावू शकतो. जर कलिंगडावर डाग दिसत असतील तर आपण ते खरेदी करू शकता, परंतु हे डाग नेमक्या कोणत्या रंगाचे आहेत यालाही महत्त्व असतं. जर कलिंगडावर काळसरपणा असेल तर ते अजिबात खरेदी करू नये.
advertisement
4/5
कलिंगड हंगामाआधीच बाजारात यावे म्हणून ते पिकवण्यासाठी काहीवेळा केमिकलचा वापर केला जातो. हे केमिकल शरीरात जाऊन आपल्या आरोग्याचं नुकसान होऊ नये यासाठी कलिंगडाची योग्य पारख करता येणं आवश्यक असतं.
advertisement
5/5
जर कलिंगडाच्या सालीवर पिवळा डाग दिसत असेल तर ते खरेदी करावं. कारण ऊन लागल्यानं कलिंगडावर हा डाग पडतो. परंतु जर कलिंगडावर गडद हिरवा डाग असेल किंवा अजिबात डागच नसेल तर मात्र ते कलिंगड केमिकलनं पिकवलेलं असण्याची शक्यता असते. या कलिंगडामुळे आरोग्याचं नुकसान होऊ शकतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
कलिंगड गोड आहे की नाही, एका सेकंदात ओळखू शकता, कापायची गरज नाही! भन्नाट ट्रिक