TRENDING:

4 असे उपाय जे दातांचा कोपरान् कोपरा करतील पांढराशुभ्र, किड अजिबात नाही टिकणार!

Last Updated:
Teeth Cleaning Tips: आपले दात सुस्थितीत, पांढरेशुभ्र असावे असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे दात पिवळे पडू लागले की, हसायलाही लाज वाटते. त्यामुळे दररोज व्यवस्थित ब्रश करणं आवश्यक असतं. नाहीतर एकदा दातांवर पिवळा थर जमायला सुरुवात झाली की तो साफ होता होत नाही. परंतु काही घरगुती उपाय करून आपण नक्कीच पिवळ्या पडलेल्या दातांचा रंग पांढराशुभ्र करू शकता. 
advertisement
1/5
4 असे उपाय जे दातांचा कोपरान् कोपरा करतील पांढराशुभ्र, किड अजिबात नाही टिकणार!
डॉ. संजय कुमार कुशवाहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, दात पिवळे पडणं, दातांना किड लागणं, इत्यादीवर आपण घरच्या घरी उपाय करू शकता.
advertisement
2/5
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हळद, मीठ आणि मोहरीचं तेल मिसळून एक छान पेस्ट करून घ्यावी. या पेस्टने दिवसातून दोनवेळी ब्रश करावं, संपूर्ण तोंड स्वच्छ करावं. यामुळे पिवळ्या दातांचा रंग बदलू शकतो.
advertisement
3/5
संत्र्याची सालदेखील दातांसाठी फायदेशीर असते. यासाठी कच्च्या संत्र्याची साल दातांवर घासावी. दिवसभरातून 2 वेळा हा उपाय करण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
4/5
लिंबाची सालही दातांसाठी उपयुक्त असते. लिंबात सिट्रिक ॲसिंड असतं. त्यामुळे ते दातांवर घासल्याने दात पांढरे होऊ शकतात.
advertisement
5/5
नारळ तेलाचा वापरही दातांसाठी फायदेशीर असतो. चमचाभर नारळाचं तेल दातांवर लावून 15 ते 20 मिनिटं दात घासावे. दरम्यान, दातांवरचा पिवळसरपणा जाता जात नसेल, तोंडातून दुर्गंधी येत असेल, दात दुखत असतील, हिरड्या सुजल्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यानुसार योग्य ते औषधोपचार करावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
4 असे उपाय जे दातांचा कोपरान् कोपरा करतील पांढराशुभ्र, किड अजिबात नाही टिकणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल