TRENDING:

हसताय ना? हसायलाच पाहिजे! फायदे भन्नाट...डॉक्टरांकडे जायची वेळ नाही येणार

Last Updated:
Laughter benefits: असं म्हणतात की, जग जिंकण्यासाठी ॲटिट्यूड नाही, फक्त एक स्माइल पुरेशी असते. तुम्हाला माहितीये का, लोकांसाठी नाही, तर स्वत:साठीही हसणं फार फायदेशीर ठरतं. यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. डॉक्टर स्वत: सांगतात की, दिवसभरातून थोडा वेळ हसण्यासाठी काढा. (अभय पांड्ये, प्रतिनिधी / कोलकाता)
advertisement
1/7
हसताय ना? हसायलाच पाहिजे! फायदे भन्नाट...डॉक्टरांकडे जायची वेळ नाही येणार
हसल्यामुळे शरिरात एंडॉर्फिनसारख्या हॅपी हॉर्मोन्सची पातळी वाढते. या हॉर्मोन्समुळे रोगप्रतिकारक शक्तीतही कमालीची वाढ होते. आतून सुदृढ राहण्यासाठी सर्वात नैसर्गिक उपाय म्हणजे हसणं.
advertisement
2/7
डॉक्टर अनिरुद्ध विश्वास यांनी दिलेल्या माहितीनुसार, हसण्यामुळे रक्तातील स्ट्रेस हॉर्मोन्सचा स्तर कमी होतो. त्यामुळे आपल्याला रिलॅक्स वाटतं. चिंता कमी होण्यास मदत मिळते.
advertisement
3/7
हसल्यानं आपला मूड चांगला राहतो. परिणामी रोगप्रतिकारक शक्ती उत्तम होते, अर्थात शरीर विविध आजारांशी लढण्यास तयार राहतं.
advertisement
4/7
हसल्यामुळे हार्ट रेट आणि ऑक्सिजन लेव्हल वाढते. ज्यामुळे हृदय सुदृढ राहतं. तसंच कार्डिओवॅस्कुलर फंक्शनमध्ये सुधारणा झाल्यानं हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
advertisement
5/7
हसल्यानं स्नायू रिलॅक्स होतात, परिणाम शांत झोप लागते. स्ट्रेस, डिप्रेशनमुळे अनेकदा झोपच लागत नाही. अशावेळी दिवसभरातून काहीवेळ हसण्यासाठी नक्की काढावा.
advertisement
6/7
डॉक्टर म्हणाले, हसणं हे काही अवघड काम नाही, शिवाय यामुळे आरोग्याला असंख्य फायदे होतात. एक हलकी स्माइल आपल्या अनेक अडचणी दूर करू शकते. त्यामुळे हसत राहा आणि खूश राहा.
advertisement
7/7
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
हसताय ना? हसायलाच पाहिजे! फायदे भन्नाट...डॉक्टरांकडे जायची वेळ नाही येणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल