TRENDING:

Airplane Mode ऑन केल्यावर फोनमध्ये नेमकं काय होतं? Switch off पेक्षा हे फीचर कसं वेगळं? यामागे आहे रंजक 'सायन्स'

Last Updated:
अनेकांना वाटतं की एअरप्लेन मोड फक्त विमानातच वापरायचा असतो, पण त्यामागचं विज्ञान आणि त्याचे फायदे खूप मोठे आहेत. आज आपण या 'सायलेंट' फिचरचा उलगडा अगदी सोप्या भाषेत करणार आहोत.
advertisement
1/7
Airplane Mode ऑन केल्यावर फोनमध्ये काय होतं? Switch off पेक्षा हे कसं वेगळं?
विमानाने प्रवास करताना किंवा कधीतरी नेटवर्कचा त्रास होत असल्यास आपण पटकन 'Airplane Mode' ऑन करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की एका साध्या बटनावर क्लिक केल्यावर फोनमध्ये असं नेमकं काय घडतं की तो जगापासून पूर्णपणे तुटतो? म्हणजे या मोडवर फोन टाकला की को बंद करण्याची गरज लागत नाही, म्हणजे या फोनमध्ये असं होतं तरी काय?
advertisement
2/7
अनेकांना वाटतं की एअरप्लेन मोड फक्त विमानातच वापरायचा असतो, पण त्यामागचं विज्ञान आणि त्याचे फायदे खूप मोठे आहेत. आज आपण या 'सायलेंट' फिचरचा उलगडा अगदी सोप्या भाषेत करणार आहोत.
advertisement
3/7
ट्रान्समीटर आणि रिसीव्हरला सुट्टीतुमचा स्मार्टफोन हा प्रत्यक्षात एक छोटा रेडिओ स्टेशन असतो. तो सतत जवळच्या टॉवरकडून सिग्नल घेतो आणि पाठवतो. जेव्हा तुम्ही एअरप्लेन मोड ऑन करता, तेव्हा फोनमधील सर्व 'रेडिओ ट्रान्समिटर्स' बंद होतात. याचा अर्थ तुमचा फोन आता कोणतेही रेडिओ लहरी (Radio Waves) सोडू शकत नाही आणि पकडूही शकत नाही.
advertisement
4/7
कोणत्या सेवा बंद होतात?सिम कार्डला येणारे नेटवर्क बंद होते, ज्यामुळे तुम्ही कॉल करू शकत नाही किंवा मेसेज पाठवू शकत नाही. सुरुवातीला वाय-फाय बंद व्हायचं, पण आता आधुनिक फोनमध्ये एअरप्लेन मोडमध्येही तुम्ही मॅन्युअली वाय-फाय सुरू करू शकता. हेडफोन्स किंवा स्मार्टवॉचसाठी वापरलं जाणारं ब्लूटूथ कनेक्शन खंडित होतं. तुमचा लोकेशन ट्रॅक करणारी जीपीएस यंत्रणा देखील सिग्नल घेणं थांबवते.
advertisement
5/7
विमानात हा मोड का अनिवार्य असतो?विमानाचे वैमानिक (Pilots) जमिनीवरील कंट्रोल टॉवरशी रेडिओ लहरींद्वारे संवाद साधत असतात. जर विमानात बसलेल्या शेकडो प्रवाशांचे फोन सुरू राहिले, तर त्यांचे सिग्नल विमानातील उपकरणांशी आणि वैमानिकाच्या हेडफोनमधील आवाजाशी 'Interference' (व्यत्यय) निर्माण करू शकतात. हा आवाज वैमानिकाला विचलित करू शकतो, म्हणूनच सुरक्षिततेसाठी एअरप्लेन मोड लावण्यास सांगितले जाते.
advertisement
6/7
विमानाशिवाय 'एअरप्लेन मोड' वापरण्याचे 5 भन्नाट फायदेविमानात नसतानाही तुम्ही हा मोड वापरून या गोष्टी करू शकता:1. बॅटरी वाचवण्यासाठी: जेव्हा फोन नेटवर्क शोधत असतो, तेव्हा तो खूप बॅटरी खातो. एअरप्लेन मोड लावला की बॅटरीचा वापर 50 % ने कमी होतो.2. फास्ट चार्जिंग: जर तुम्हाला फोन लवकर चार्ज करायचा असेल, तर तो एअरप्लेन मोडवर टाका. बॅकग्राउंडमधील सिग्नल सर्चिंग बंद झाल्यामुळे फोन झटपट चार्ज होतो.
advertisement
7/7
3. व्यत्यय टाळण्यासाठी: शांत झोप घ्यायची असेल किंवा महत्त्वाचं काम करायचं असेल, तर कॉल आणि नोटिफिकेशन टाळण्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे.4. नेटवर्क रिफ्रेश करण्यासाठी: कधीकधी फोनमध्ये नेटवर्क जाम होतं. अशा वेळी फोन 'रीस्टार्ट' करण्याऐवजी एअरप्लेन मोड एकदा ऑन करून ऑफ करा, नेटवर्क पुन्हा व्यवस्थित येतं.5. मुलांच्या हातात फोन देताना: मुलं चुकून कोणालाही कॉल लावू नयेत किंवा इंटरनेटवर काही पाहू नये, असं वाटत असेल तर हा मोड नक्की वापरा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Airplane Mode ऑन केल्यावर फोनमध्ये नेमकं काय होतं? Switch off पेक्षा हे फीचर कसं वेगळं? यामागे आहे रंजक 'सायन्स'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल