उन्हाळ्यात फ्रीजमधील थंड फळे खाणं योग्य की अयोग्य? पाहा आहारतज्ज्ञांचा सल्ला
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
उन्हाळ्यात थंड खाण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यासाठी अनेकजण कलिंगड सारखी फळे फ्रिजमध्ये ठेवून खातात.
advertisement
1/7

उन्हाळ्यात कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध पर्याय अवलंबले जातात. त्यामुळेच चौका चौकात सरबत, मठ्ठा आदी पेयांचे स्टॉल लागलेले असतात. त्यासोबतच फ्रुट स्टॉल देखील पाहायला मिळतात.
advertisement
2/7
या फळांच्या स्टॉलवर बऱ्याचदा फळे थंड होण्यासाठी बर्फाच्या लादिवर कापून ठेवलेली असतात. मात्र अशा स्टॉलवर मिळणाऱ्या थंड फळांचा किंवा घरातही फ्रिजमध्ये थंड केलेल्या फळांचा आस्वाद घेणे शरीरासाठी कितपत घातक ठरू शकते, याबाबत <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापूरच्या</a> आहारतज्ज्ञ अमृता सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
advertisement
3/7
कडक उन्हाचा तडाखा जाणवायला आता सुरू झाला आहे. उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी बऱ्याच जणांचा काहीतरी थंड खाण्याकडे किंवा थंड पेये पिण्याकडे जास्त कल असतो. पण या काळात थंड करून खाल्ल्या जाणाऱ्या गोष्टीमधे फळेही असतात.
advertisement
4/7
फळे एकतर फ्रिजमध्ये ठेऊन गार केली जातात किंवा बाहेर फळांच्या स्टॉलवर तर बर्फामध्ये ठेऊन गार गेलेली फळे खाल्ली जातात. पण ही फळे अशा पद्धतीने खाल्ल्यावर जशी शरीराला थंडावा देतात, तशीच ती आपल्या शरीरासाठी काही प्रमाणात घातकही ठरू शकतात, असे मत अमृता सूर्यवंशी यांनी व्यक्त केले आहे.
advertisement
5/7
खरंतर थंड फळांमुळे शरीराला मिळणारा थंडावा हा तात्पुरत्या स्वरुपाचा असतो. मात्र त्यानंतर आपल्या शरीरामध्ये पोटाशी संबंधित समस्या किंवा घशामध्ये त्रास होऊ लागतो. सर्दी, खोकला यासारख्या बऱ्याच समस्या या थंड फळांमुळे होऊ शकतात. फळे थंड केल्याने त्यांच्यातील अँटिऑक्सिडंट्स खराब होऊ शकतात, असे अमृता सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
advertisement
6/7
थंड करुन फळे खाल्ल्याने होणारा त्रास लक्षात घेता जर फळे थंड करुनच खायची असतील, तर एकतर फ्रीजमधून एक तास किंवा अर्धातास आधी काढून ठेवावीत. फळांचे तापमान अतिथंड न राहता साधारण सामान्य करून मग त्या फळांचे सेवन करावे. किंवा फ्रीजमध्ये न ठेवता ताजी फळे तशाच पद्धतीने कट करून खाल्लीत तर ती शरीरासाठी अधिक चांगली ठरतात, असे अमृता सांगतात.
advertisement
7/7
दरम्यान, मुळातच थंडावा देण्याचा फळांचा गुणधर्मच आहे. त्यामुळे थंड न करता खालील फळे देखील शरीराला थंडावा देतात. त्यामुळेच कोणतीही फळे फ्रिजमध्ये न ठेवता सामान्य तापमानाला असतानाच चिरून खाल्लीत तर ती शरीरासाठी जास्त फायदेशीर असतात, असेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. (साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हाळ्यात फ्रीजमधील थंड फळे खाणं योग्य की अयोग्य? पाहा आहारतज्ज्ञांचा सल्ला