कडू असलं तरी कारलं का खायला हवं? डायबेटिससाठी वरदान आहे ही भाजी
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
कारल्याचं नाव काढलं तरी तोंड कडवट करणारे लोक आहेत. पण आयुर्वेदानुसार ही भाजी अत्यंत बहुगुणी आहे. कारली खाण्याचे अनेक फायदे आहेत. Diabetes असलेल्यांनी तर जरूर कारलं खावं असं तज्ज्ञ सांगतात.
advertisement
1/5

मधुमेह असलेल्यांनी कारल्याची भाजी नियमितपणे खाल्ली पाहिजे. या भाजीचे फायदे काय आहेत याविषयी तज्ज्ञांनी दिलेला सल्ला..
advertisement
2/5
मध्य प्रदेशातील खरगोनचे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ.संतोष मौर्य सांगतात की, कारल्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहते. शिवाय पाचनशक्तीही सुधारते. कारल्याचा रस घेतल्याने मंदावलेली भूक सुधारते.
advertisement
3/5
कारल्यामध्ये असलेल्या औषधीय गुणांमुळे पाइल्स किंवा भगंदरसारखे आजार नियंत्रित राहतात. मूळव्याधीचे प्रमाण आटोक्यात राहते. पोट साफ होण्यास मदत होत असल्याने कारलं नियमित खाल्लं पाहिजे.
advertisement
4/5
कारल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. यात असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे वेगवेगळ्या संसर्गापासून शरीराचा बचाव होतो. सर्दी-खोकल्यासारखे आजार दूर राहतात.
advertisement
5/5
कारलं कसं खायचं याचे अनेक मार्ग आहेत. शिजवून भाजी म्हणून खाऊ शकता. किंवा कारल्याचा रस काढून पिऊ शकता. कारल्याचा कडूपणा झेपत नसेल तर त्यात थोडा लिंबाचा रस आणि मध घालून रस पिता येईल. कारलं खाण्याचे फायदे असते तरी ते प्रमाणात खाणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात कारलं खाल्लं तर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे औषध म्हणून खाताना तज्ज्ञांच्या सल्लाने याचा वापर करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
कडू असलं तरी कारलं का खायला हवं? डायबेटिससाठी वरदान आहे ही भाजी