Health Tips : कडू कारलं... रामबाण उपाय! अन्नपचनापासून ब्लड प्रेशरपर्यंत सर्व आजारांतून व्हाल मुक्त
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
कारलं कडू असलं तरी त्याचे आरोग्यदायी फायदे अमृतासारखे आहेत. आपल्या पारंपरिक आयुर्वेदात कारल्याला मधुमेह, पचन आणि त्वचारोगांसाठी विशेष औषध मानले आहे. जरी त्याची चव सर्वांना आवडत नाही, तरी त्याच्या अनेक फायद्यांमुळे आपल्या आहारात कारलं समाविष्ट करणं आवश्यक ठरतं. चला पाहूया, कारलं कसं आपल्या आरोग्याचं रक्षण करतं आणि निरोगी जीवनाचा मार्ग दाखवतं.
advertisement
1/5

मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त कारल्यात इन्सुलिनसारखी संयुगे असतात, जी रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. हे मधुमेह रुग्णांसाठी नैसर्गिक औषधासारखे काम करते. त्यात फायबर भरपूर आणि कॅलरी कमी असल्यामुळे पचन सुधारते आणि मेटाबॉलिझम वाढतो.
advertisement
2/5
आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हेमा गोस्वामी सांगतात की, कारल्यात व्हिटॅमिन ए आणि कॅरोटिनॉइड्स आहेत, जे डोळ्यांची दृष्टी सुधारतात. नियमित कारल्याचे सेवन दृष्टी सुधारण्यात मदत करतं आणि मोतीबिंदूसारख्या समस्यांपासून संरक्षण करतं.
advertisement
3/5
कारलं शरीरातील विषारी घटक काढून टाकून त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवतं. त्याच्या सेवनामुळे त्वचेवरील मुरुम आणि पिंपल्स कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. याशिवाय, हे यकृत निरोगी ठेवतं आणि शरीराचे कार्य सुधारते.
advertisement
4/5
कारल्याची पाने उकळून त्याचे पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे शरीराला विविध आजारांशी लढण्याची ताकद मिळते, ज्यामुळे सर्दी आणि इतर संसर्गांपासून बचाव होतो.
advertisement
5/5
कारल्याचा रस जखमेवर लावल्याने थंडावा मिळतो आणि वेदना कमी होतात. तसेच, कारल्याच्या मुळांचा लेप जखमेवर लावल्यास ती लवकर भरून येते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : कडू कारलं... रामबाण उपाय! अन्नपचनापासून ब्लड प्रेशरपर्यंत सर्व आजारांतून व्हाल मुक्त