TRENDING:

Summer Tips: खूप तहान लागते! उन्हाळ्यात दिवसभरातून पाणी प्यावं तरी किती? आपल्याला हेच माहित नसतं

Last Updated:
फेब्रुवारी महिनाअखेरीस सुरू झालेल्या उन्हाच्या झळा आता प्रचंड तीव्र झाल्या आहेत. सकाळ होताच शरीर घामाच्या धारांनी ओलंचिंब होतं, भरदुपारच्या उन्हात घराबाहेर पडायचं म्हटलं तर नकोसं वाटतं. अशावेळी शरिराला पाण्याची सतत गरज भासते. डॉक्टरही उन्हाळ्यात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. आज आपण या दिवसांत भरपूर म्हणजे नेमकं किती पाणी प्यावं याचं अचूक प्रमाण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत. (आकांशा दीक्षित, प्रतिनिधी / नवी दिल्ली)
advertisement
1/5
Summer Tips: खूप तहान लागते! उन्हाळ्यात दिवसभरातून पाणी प्यावं तरी किती?
उन्हाळ्यात घामावाटे शरिरातलं पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतं आणि शरिराला पाण्याची नितांत गरज असते, त्यामुळे ती आपण वेळोवेळी भागवली पाहिजे. तरच शरीर हायड्रेटेड आणि आरोग्य सुदृढ राहील.
advertisement
2/5
राजधानी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टर टीना कौशिक यांनी सांगितलं की, उन्हाळ्यात खूप कमी तर नाहीच, पण भरपूर म्हणजे अति पाणी प्यायचं नाही. शरिरात योग्य प्रमाणात पाणी जायला हवं.
advertisement
3/5
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वांनी आपापल्या वजनानुसार पाणी प्यावं. सर्वसाधारणपणे दिवसभरातून 8 ते 10 ग्लास पाणी प्रत्येक व्यक्तीच्या शरिरात जायलाच हवं.
advertisement
4/5
पाणी हे जीवन आहे, असं म्हणतात ते काही खोटं नाही. शरिराला पाण्याचे विविध फायदे होतात. विशेषतः किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्यावर पाणी उपयुक्त असतं. ज्या व्यक्तींना मूतखड्याचा त्रास असेल त्यांनी भरपूर पाणी प्यावं.
advertisement
5/5
उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी फ्रिजमधलं थंड पाणी प्यावं असं बऱ्याचदा वाटतं. परंतु हे पाणी पिणं टाळावं. कारण त्यामुळे भूक कमी होते. शरिरातलं अँडोटॉक्सिन रिलीज होतं. त्यामुळे उन्हाळ्यात साधं किंवा गरम पाणी प्यावं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Tips: खूप तहान लागते! उन्हाळ्यात दिवसभरातून पाणी प्यावं तरी किती? आपल्याला हेच माहित नसतं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल