Glowing त्वचेसाठी हळदच Best! पार्लरची गरज पडणार नाही, फक्त वापर माहित हवा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
हळदीला भारतीय स्वयंपाकघरातलं सोनं मानलं जातं. मसाला म्हणून वापराव्यतिरिक्त आयुर्वेदात हळदीचे विविध उपाय सांगितले आहेत. (रुपांशू चौधरी, प्रतिनिधी / हझारीबाग)
advertisement
1/6

हळदीचा उपयोग जवळपास रोजच्या जेवणात केला जातो. पदार्थांना रंग आणि चव देण्यासह हळद विविध आजारांवर उपयुक्त असते. त्यामुळे आजीबाईच्या बटव्यापासून आयुर्वेदिक उपचारांमध्ये तिची आपल्या आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
advertisement
2/6
झारखंडच्या हझारीबागेतील जिल्हा आयुष अधिकारी देव नंदन तिवारी सांगतात की, हळदीला भारतीय स्वयंपाकघरातलं सोनं मानलं जातं. तिचं सेवन करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
advertisement
3/6
दुखापतीतून झालेली कोणतीही जखम हळदीमुळे भरून निघते. दुखापतीमुळे आलेली सूजही हळदीचा लेप लावल्यास ओसरते.
advertisement
4/6
मधुमेहात हळद एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. तिच्या सेवनाने रक्तातली साखर नियंत्रित राहण्यास मदत मिळते. शिवाय यकृत आणि स्वादुपिंडही सुदृढ राहतं.
advertisement
5/6
त्वचेसाठी हळद अत्यंत गुणकारी असते. मुरुम, डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं, फिकटपणा, कोरडेपणा, सुरकुत्या हळदीमुळे कमी होऊ शकतात.
advertisement
6/6
तोंडाची दुर्गंधी आणि कमकुवत हिरड्यांवरही हळद अत्यंत प्रभावी ठरते. शिवाय साथीच्या आजारांवर हळदीमुळे आराम मिळतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Glowing त्वचेसाठी हळदच Best! पार्लरची गरज पडणार नाही, फक्त वापर माहित हवा