TRENDING:

आपण जी फळं खातो ती चेहऱ्यावर लावताच Glow येतो; कसा करावा वापर?

Last Updated:
चेहऱ्यावर ग्लो यावा, पिंपल, डाग जाऊन चेहरा क्लीन दिसावा, यासाठी आपण बाजारातून वेगवेगळे महागडे प्रॉडक्ट्स आणून वापरतो. काही प्रॉडक्टमध्ये असलेल्या केमिकल्समुळे त्वचा निस्तेज होऊ शकते. त्यापेक्षा आपण काही घरगुती उपायांनीही चेहऱ्यावर जबरदस्त ग्लो मिळवू शकतो. तज्ज्ञ मुकेश लोरा सांगतात की, आपण जी फळं खातो, तीच चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असतात. (काजल मनोहर, प्रतिनिधी / जयपूर)
advertisement
1/7
आपण जी फळं खातो ती चेहऱ्यावर लावताच Glow येतो; कसा करावा वापर?
केळ्यामुळे चेहरा अगदी सुंदर दिसू शकतो. त्यासाठी केळ्याच्या शेकमध्ये मध मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो. तसंच पिकलेल्या केळ्याचा गर लावून मसाज केल्यास त्वचा उजळते. शिवाय सुरकुत्याही हळूहळू दूर होतात. केळ्यात गुलाबपाणी आणि मध मिसळून लावल्यास त्वचेचा कोरडेपणा जाऊ शकतो.
advertisement
2/7
संत्र्याची साल आणि गर दोन्ही त्वचेसाठी गुणकारी असतात. या गराने मसाज केल्यास त्वचेतली सगळी घाण निघून जाते. तर, संत्र्याची साल सुकवून तिची पावडर बनवून दुधात मिसळून चेहऱ्यावर लावावी. 15-20 मिनिटांनी चेहरा धुतल्यास त्वचेवर तेज येतं.
advertisement
3/7
सफरचंदामुळे चेहरा अगदी टवटवीत दिसतो. त्यासाठी साल काढून सफरचंदाचे काही तुकडे मिक्सरमध्ये बारीक करा, त्याची दुधात पेस्ट बनवा. या पेस्टने चेहऱ्याला मसाज करा. 10 दिवस असं केल्यास पिंपल आणि डाग दूर होतात.
advertisement
4/7
पपई म्हणजे एक उत्तम स्क्रबर. यामुळे त्वचा मऊ होते. पपईच्या गरात मध मिसळून चेहऱ्याला लावल्यास डाग कमी होतात.
advertisement
5/7
आंब्यामुळे त्वचेवर तरुणपण येतं. यात व्हिटॅमिन ए असल्यामुळे चेहऱ्याला अगदी टॉनिक मिळतं. आंब्याचा रस काढून त्यात दूध, सुंठ आणि चमचाभर तूप मिसळायचं. हे मिश्रण 1-2 महिने प्यायल्यास चेहऱ्यावर आकर्षक ग्लो येऊ शकतो. आंब्याच्या गरात चिमूटभर हळद मिसळून मसाज केल्यानेही चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
advertisement
6/7
लिंबात भरपूर व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/aloe-vera-gel-benefits-for-face-and-skin-l18w-mhij-1218745.html">त्वचेतली घाण बाहेर पडते</a>. डाग, पिंपल सर्वकाही स्वच्छ होतात. तर, डाळिंबात असलेल्या अँटिऑक्सिडंट गुणधर्माचाही <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/benefits-of-banana-peel-for-healthy-skin-mhij-1215587.html">त्वचेला फायदा</a> होतो.
advertisement
7/7
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/beauty-tips-for-pink-and-soft-lips-mhij-1223865.html">आरोग्याबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
आपण जी फळं खातो ती चेहऱ्यावर लावताच Glow येतो; कसा करावा वापर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल