TRENDING:

सकाळी रिकाम्या पोटी फळं खाणं खरंच योग्य की अयोग्य? आहार तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

Last Updated:
वर्षभरात वेगवेगळ्या ऋतुमानानुसार बाजारात वेगवेगळी फळे विक्रीसाठी उपलब्ध होत असतात. पण ही फळे कधी खावीत याबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/7
सकाळी रिकाम्या पोटी फळं खाणं योग्य की अयोग्य? आहार तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
बऱ्याच जणांना सकाळी उठल्यानंतर भूक लागते. अशावेळी फळे, दूध, चहा किंवा नाश्त्याचे पदार्थ यापैकी काहीही खाल्ले जाते. काहीजण सकाळी उठल्यावर तब्येतीसाठी म्हणून फळांचे सेवन करतात. पण उपाशी पोटी फळे खाणे खरंच शारीरिक दृष्ट्या चांगले असते का? हे देखील जाणून घेणं गरजेचे आहे. <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापूरच्या</a> आहारतज्ज्ञ स्नेहल पै यांनी याबाबत माहिती दिलीय.
advertisement
2/7
वर्षभरात वेगवेगळ्या ऋतुमानानुसार बाजारात वेगवेगळी फळे मिळतात. या फळांचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरास वेगवेगळी जीवनसत्त्वे मिळत असतात. त्यामुळे शरीरासाठी फळे लाभदायकच असतात. सकाळी उपाशीपोटी अशी फळे खाणे हे देखील आरोग्यदायीच असते, असे आहारतज्ज्ञ स्नेहल पै सांगतात.
advertisement
3/7
रात्रीच्या जेवणानंतर सकाळी काही खाईपर्यंत बराच काळ आपल्या पोटात काहीही जात नाही. त्यामुळे सकाळी खूप भूक लागू शकते. मात्र इतका वेळ काही न खाता राहिल्यामुळे पचनक्रिया देखील मंदावलेली असते. त्यामुळे अशावेळी पचनास जड पदार्थ आपण खाऊ शकत नाही. म्हणून रिकाम्या पोटी फळे खाणे हा उत्तम उपाय असू शकतो.
advertisement
4/7
फळे ही पचायला हलकी असतात. त्याचबरोबर ती अनेक पोषकतत्वांनी युक्त असतात. हीच पोषकतत्वे रिकाम्या पोटी शरीराला अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतात. त्यामुळे उपाशीपोटी फळे खाणे कधीही चांगलेच, असे स्नेहल यांनी सांगितलं.
advertisement
5/7
सकाळी उपाशीपोटी फळे खाणे कधीही चांगलेच. मात्र सकाळच्या नाष्ट्याऐवजी फक्तच फळे खाणे अयोग्य आहे. कारण सकाळच्या वेळी आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते. ती फक्त फळांच्या सेवनाने पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच दिवसभर थकवा जाणवून सारखी भूक लागू शकते. अशावेळी फळांसोबत उकडलेली अंडी किंवा मोड आलेली कडधान्य खावीत.
advertisement
6/7
रात्रीच्या जेवणानंतर बऱ्याच जणांना फळे खाण्याची सवय असते. मात्र रात्री झोपण्याआधी, जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच फळे खाऊ नयेत. ज्यांना अ‍ॅसिडिटीचा खूप त्रास होतो त्यांनी देखील सकाळी उपाशीपोटी फळे खाऊ नये. सकाळ ऐवजी अशा लोकांनी दोन जेवणांच्या मध्ये फळे खावीत. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनीही गोड फळे सकाळी उपाशीपोटी खाणे टाळावे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
advertisement
7/7
एकंदरीत सकाळी उपाशीपोटी फळे खाणे हे योग्य असले, तरी शरीरास त्रासदायक ठरणारी आम्लयुक्त, जास्त गोड अशी फळे खाऊ नयेत. अन्यथा त्याचे उलट परिणाम भोगावे लागू शकतात. (साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
सकाळी रिकाम्या पोटी फळं खाणं खरंच योग्य की अयोग्य? आहार तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल