TRENDING:

रात्री कारलं खाणं ठरू शकतं धोकादायक! शुगरच्या रुग्णांनी तर अशी चूक करूच नये

Last Updated:
चवीला कडू असणारं कारलं आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानलं जातं. कारलं शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतं. शुगरचे रुग्णही कारलं खाऊ शकतात. परंतु, कारल्याची भाजी रात्री खाणं शक्यतो टाळलं पाहिजे. कारण आरोग्यास ते धोकादायक ठरू शकतं. विशेषत: ज्यांचं पोट खराब आहे, त्यांनी तर ते टाळलंच पाहिजे.
advertisement
1/6
रात्री कारलं खाणं ठरू शकतं धोकादायक! शुगरच्या रुग्णांनी तर अशी चूक करूच नये
झारखंडची राजधानी रांचीचे आयुर्वेदिक डॉ व्हीके पांडे यांनी कारल्याच्या गुणधर्मांबाबत माहिती दिलीय. कारल्याची भाजी रात्री चुकूनही खाऊ नये. त्यामुळे <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/health-tips-in-marathi-do-not-eat-fish-and-these-5-things-with-milk-may-be-harmful-to-health-know-doctor-advice-mhlsp-l18w-1210098-page-5.html">आरोग्याशी संबंधित समस्या</a> निर्माण होऊ शकतात, असे ते सांगतात.
advertisement
2/6
कारल्यात रक्तातील शुगरचं प्रमाण कमी करण्याची क्षमता असते. रात्री कारलं खाल्ल्यानं मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या रक्तातील शुगर जास्त प्रमाणात कमी होऊ शकते. तसंच रुग्णांच्या शरीरातील इन्सुलिनचं प्रमाणही कमी होतं.
advertisement
3/6
रात्री कारलं खाल्ल्यानंतर मधुमेहींच्या शरीरातील शुगर एकदम कमी होऊ शकते. त्यामुळे रात्री उलटी, चक्कर येणं, अस्वस्थ होण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शुगरच्या रुग्णांनी चुकूनही रात्रीच्या वेळी कारलं खाऊ नये.
advertisement
4/6
दरम्यान, कारलं पचण्यासाठी पचनसंस्था मजबूत असावी लागते. रात्री पचन यंत्रणा थोडीशी कमजोर असते. रात्री कारलं खाल्ल्यास अपचन आणि गॅसेससारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळं शक्यतो ज्यांना पोटाचा त्रास आहे त्यांनी तर रात्री कारलं खाणं टाळलंच पाहिजे.
advertisement
5/6
कारलं हे थंड प्रभाव असणारी भाजी आहे. ते रात्री खाल्ल्यास सर्दी, खोकला किंवा सर्दी होऊ शकते. त्यासाठी ज्यांना सर्दीचा त्रास किंवा थंडी जास्त जाणवते, अशांनी रात्रीच्या वेळी कारलं टाळावं, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
6/6
सूचना: या बातमीत दिलेले आरोग्यविषयक सल्ले तज्ज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहेत. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वापरावी. अशा कोणत्याही वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही हानीसाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
रात्री कारलं खाणं ठरू शकतं धोकादायक! शुगरच्या रुग्णांनी तर अशी चूक करूच नये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल