TRENDING:

किडनीसाठी वरदान कोथिंबीर सूप, घरीच बनवा अगदी सोपी रेसिपी

Last Updated:
Coriander Soup: कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत आणि किडनीसाठी वरदान मानलं जाणारं कोथिंबीर सूप अगदी सोप्या पद्धतीनं बनवता येतं. पाहा रेसिपी.
advertisement
1/5
किडनीसाठी वरदान कोथिंबीर सूप, घरीच बनवा अगदी सोपी रेसिपी
उत्तम आरोग्यासाठी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. प्रत्येक ऋतुतील पदार्थ आपल्या आहारात येण्याची गरज असते. हिवाळ्यात काहीजण सूप पिण्याला प्राधान्य देतात. विविध भाज्यांचेही सूप बनवले जाते. कोथिंबीरचे सूप पिणंही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा तल्हार यांनी कोथिंबीर सूपची रेसिपी सांगितली आहे.
advertisement
2/5
कोथिंबीर सूप अगदी घरातील साहित्यापासून बनवू शकतो. त्यासाठी 1 वाटी कोथिंबीर, 2 चमचे भिजवलेले आणि मोड आलेले मूग, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अद्रकचा तुकडा आणि एक हिरवी मिरची, काळीमिरी पावडर हे साहित्य लागेल.
advertisement
3/5
सर्वप्रथम एका कढईमध्ये 3 वाट्या पाणी घ्यायचं. त्यामध्ये मोड आलेले मूग घालून त्याला उकळून द्यायचे. त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि लगेच मूग आणि कोथिंबीर काढून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, मूग, लसूण, आद्रक, एक हिरवी घ्यायचे आणि पाणी टाकून हे एकत्र एकजीव करून घ्यायचं.
advertisement
4/5
त्यानंतर सर्व हे मिश्रण गाळणीने गाळून घ्यायचं आणि गॅस वरती ठेवून त्याला एक उकळी येऊ द्यायची. चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडीशी काळी मिरीची पावडर टाकायची. अशा पद्धतीने अगदी 5 ते 10 मिनिटांत सूप बनवून तयार होतं. त्यात आवश्यकतेनुसार लिंबू देखील टाकू शकता, असं डॉक्टर तल्हार सांगतात.
advertisement
5/5
दरम्यान, या हिवाळ्यामध्ये हे कोथिंबीरचे सूप अगदी झटपट तयार करू शकता. हिवाळ्यामध्ये हे सूप आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायी ठरतं. विशेष म्हणजे शरीरात कॅल्शिअम वाढीसाठी आणि किडनीसाठी ते वरदान मानलं जातं. त्यामुळे तुम्ही हे आरोग्यदायी कोथिंबीर सूप आपल्या घरी नक्की ट्राय करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
किडनीसाठी वरदान कोथिंबीर सूप, घरीच बनवा अगदी सोपी रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल