TRENDING:

Health Tips : नुसती चव आणि गंधच नाही, तर आरोग्याचा खजिना आहे कढीपत्ता, हे फायदा पाहाल, तर रोज खाल

Last Updated:
आपल्या रोजच्या जेवणात फोडणीला विशेष महत्त्व असते. फोडणीमध्ये वापरला जाणारा कढीपत्ता केवळ चव आणि सुगंध वाढवण्यासाठीच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त ठरतो.
advertisement
1/7
नुसती चव आणि गंधच नाही, तर आरोग्याचा खजिना आहे कढीपत्ता, हे फायदा पाहाल, तर रोज खाल
आपल्या रोजच्या जेवणात फोडणीला विशेष महत्त्व असते. फोडणीमध्ये वापरला जाणारा कढीपत्ता केवळ चव आणि सुगंध वाढवण्यासाठीच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त ठरतो. पोहे, उपमा, आमटी, सांबार अशा पदार्थांमध्ये कढीपत्ता घातला की, त्याची चव दुप्पट होते. पण याच कढीपत्त्यामध्ये अनेक औषधी गुण दडलेले आहेत, हे अनेकांना ठाऊक नसते. कढीपत्ता आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? याबाबत माहिती डॉ. धीरज आंडे यांनी दिली आहे.
advertisement
2/7
डॉ. धीरज आंडे सांगतात की, आयुर्वेदानुसार कढीपत्ता ही एक सुवासिक औषधी वनस्पती असून त्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषक घटक आढळतात. कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन C यांचा समृद्ध स्रोत असलेला कढीपत्ता हाडांच्या मजबुतीसाठी विशेष फायदेशीर आहे. विशेषतः महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळते. अशा वेळी कढीपत्त्याचा नियमित वापर हाडदुखी, सांधेदुखी आणि थकवा यांसारख्या समस्या कमी करण्यास मदत करू शकतो.
advertisement
3/7
कढीपत्त्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो. त्यामुळे नैसर्गिकरीत्या शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
advertisement
4/7
सकाळी कढीपत्ता उकळून त्याचे कोमट पाणी पिणे वजन नियंत्रणासाठी उपयुक्त मानले जाते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासही मदत मिळते.
advertisement
5/7
केस आणि त्वचेसाठीही कढीपत्ता अत्यंत लाभदायक आहे. त्यातील पोषक घटक केस गळती कमी करण्यास, केस मजबूत करण्यास तसेच त्वचेची चमक वाढविण्यास मदत करतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठीही कढीपत्ता उपयुक्त मानला जातो.
advertisement
6/7
आहारात कढीपत्ता वेगवेगळ्या प्रकारे समाविष्ट करता येतो. कढीपत्ता आणि तीळ यांची चटणी कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. तसेच नाचणीसोबत कढीपत्ता घेतल्यास हाडांसाठी अधिक फायदेशीर ठरते. बदाम, पनीर यांसारख्या पदार्थांसोबत कढीपत्ता खाल्ल्यास शरीराला अधिक पोषण मिळते.
advertisement
7/7
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक जण महागडी औषधे आणि सप्लिमेंट्सकडे वळतात. मात्र, आपल्या स्वयंपाकघरातील साधा कढीपत्ता हे एक नैसर्गिक ‘सुपरफूड’ असून तो नियमित आहारात घेतल्यास शरीर निरोगी ठेवण्यास मोठी मदत होऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : नुसती चव आणि गंधच नाही, तर आरोग्याचा खजिना आहे कढीपत्ता, हे फायदा पाहाल, तर रोज खाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल