heatstroke : उन्हाळ्यात वाढला आजारांचा धोका, या गोष्टी ठरतील शरीराला खूपच फायदेशीर
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका जाणवत आहे. अशा परिस्थितीत सर्वत्र उन्हाचा पारा चाळिशीपार गेला आहे. अनेकांना उन्हाचा फटकाही बसत आहे. आजार वाढण्याचाही धोका आहे. त्वचेचा आणि पोटाचाही आजार यासोबतच इतरही प्रकारच्या समस्या जाणवतात. अशाप्रकारे तुम्ही स्वत:ला वाचवण्यासाठी आपल्या दिनचर्येत बदल करण्याची गरज आहे. यामुळे तुम्ही स्वत:ला चांगल्या प्रकारे ठेऊ शकतात. तसेच उन्हाळ्याच्या मोसमात डझनभर आजारांपासून वाचू शकतात. (आशीष त्यागी/बागपत, प्रतिनिधी)
advertisement
1/4

आयुर्वेदिक डॉ. सुनीता सोनल धामा (निधि क्लीनिक खेकडा, बागपत) यांनी याबाबत लोकल18 ला माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, उन्हाळ्यात गरम हवा चालतात. यामुळे उष्माघाताचा मोठा फटका बसू शकतो. उष्माघाताचा शरीरावर मोठा वाईट प्रभाव पडतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या दिनचर्येत लहान बदल केले तर तुम्ही उन्हाळ्यात पूर्णप्रकारे आरोग्यदायी राहाल.
advertisement
2/4
डॉ. सुनीता यांनी सांगितले की, तुम्ही तुमच्या आहारात फळांचा समावेश करायला हवा. टरबूज, काकडी, खिरा यांसारखे फळ तसेच भाज्या ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे, त्यांचा समावेश करावा. तसेच उन्हात घराच्या बाहेर निघू नये, असा प्रयत्न करावा.
advertisement
3/4
तसेच जर जाल तर आपल्या डोक्यावर कपडे ठेवावे आणि शरीरही पूर्ण झाकले जाईल, असे कपडे परिधान करावे. भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. कोणत्याही प्रकारची समस्या समोर आल्यानंतर लवकरच जवळच्या डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
4/4
उष्माघाताचा मानवी शरीरावर मोठा फटका बसतो. पोटाच्या समस्या सुरू होतात. तसेच शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे जास्त पाणी असणारी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे. यामुळे आरोग्य चांगले राहील आणि उष्माघाताचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. (सूचना - ही माहिती संबंधित विषयातील तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
heatstroke : उन्हाळ्यात वाढला आजारांचा धोका, या गोष्टी ठरतील शरीराला खूपच फायदेशीर