TRENDING:

Jaggery Tea : गुळाचा चहा बनवताना दूध फाटतंय? 'या' सोप्या टिप्स वापरा; मिळेल साखरेपेक्षाही भारी चव अन् आरोग्य

Last Updated:
गुळाचा चहा बनवणं हे एक मोठं कसब आहे. अनेकदा चहा उकळताना गूळ टाकला की दूध फाटतं आणि चहाची चव अन् रंग दोन्ही बिघडतं. तुमच्यासोबतही असं वारंवार होत असेल, तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला चहा न फाटता तो हॉटेलसारखा दाटसर आणि चविष्ट कसा बनवायचा, याच्या काही खास ट्रिक्स सांगणार आहोत.
advertisement
1/7
गुळाचा चहा बनवताना दूध फाटतंय? 'या' सोप्या टिप्स वापरा; मिळेल साखरेपेक्षाही भारी
पहाटेची प्रसन्न वेळ असो किंवा सायंकाळची थंड झुळूक, हातामध्ये वाफाळलेला चहाचा कप असेल तर थकवा क्षणात पळून जातो. त्यातही सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत, अशा वेळी साखरेच्या चहापेक्षा 'गुळाचा चहा' (Jaggery Tea) पिण्याकडे अनेकांचा कल असतो. गूळ केवळ चहाची चव वाढवत नाही, तर तो आरोग्यासाठी एक वरदान मानला जातो.
advertisement
2/7
मात्र, गुळाचा चहा बनवणं हे एक मोठं कसब आहे. अनेकदा चहा उकळताना गूळ टाकला की दूध फाटतं आणि चहाची चव अन् रंग दोन्ही बिघडतं. तुमच्यासोबतही असं वारंवार होत असेल, तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला चहा न फाटता तो हॉटेलसारखा दाटसर आणि चविष्ट कसा बनवायचा, याच्या काही खास ट्रिक्स सांगणार आहोत.
advertisement
3/7
दूध का फाटतं? त्यामागचं विज्ञान जाणून घ्यागुळामध्ये नैसर्गिकरित्या थोड्या प्रमाणात आम्ल (Acidity) असते. जेव्हा आपण कडक उकळत्या दुधात गूळ टाकतो, तेव्हा त्यातील उष्णता आणि आम्ल यांची रासायनिक प्रक्रिया होऊन दूध लगेच फाटतं. याव्यतिरिक्त, बाजारात मिळणाऱ्या भेसळयुक्त किंवा रासायनिक पांढऱ्या गुळामुळेही दूध खराब होण्याची शक्यता जास्त असते.
advertisement
4/7
योग्य गुळाची निवड कशी करावी?चहासाठी नेहमी गडद रंगाचा किंवा सेंद्रिय (Organic) गुळाचा वापर करावा. जो गूळ दिसायला जास्त पांढरा असतो, त्यात रसायनांचा वापर केलेला असतो. चहासाठी 'पेंढरी' किंवा सेंद्रिय काळा गूळ सर्वोत्तम मानला जातो, यामुळे चहा फुटत नाही आणि चवही उत्तम लागते.
advertisement
5/7
चहा न फाटता बनवण्याची योग्य पद्धत (Step-by-Step):1. मसाल्यांची तयारी: चहाचा सुंगध आणि गुणधर्म वाढवण्यासाठी आलं, दोन वेलची, थोडी मिरी आणि ४-५ तुळशीची पाने खलबत्त्यात ठेचून घ्या. हे मसाले प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहेत.2. एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात चहा पावडर आणि तयार केलेला मसाला टाकून चांगलं उकळून घ्या.३. गुजेव्हा पाणी चांगलं उकळेल, तेव्हा त्यात किसलेला गूळ टाका. गूळ पूर्णपणे विरघळू द्या आणि आता या काळ्या चहाला चांगली उकळी येऊ द्या.4. महत्त्वाची ट्रिक (दूध टाकण्याची पद्धत): चहा फाटू नये म्हणून सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे दूध वेगळ्या भांड्यात गरम करून घ्या. उकळत्या काळ्या चहामध्ये गार दूध टाकू नका. गरम दूध टाकल्यामुळे तापमानाचा समतोल राखला जातो आणि दूध फाटत नाही.5. गरम दूध टाकल्यानंतर चहा फक्त 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर उकळा आणि त्यानंतर लगेच कपमध्ये गाळून घ्या.
advertisement
6/7
गुळाच्या चहाचे 'हे' फायदे माहीत आहेत का?साखरेच्या तुलनेत गुळात मुबलक प्रमाणात लोह असते, जे रक्ताची कमतरता भरून काढते.हिवाळ्यात गूळ शरीराला उबदार ठेवतो आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करतो.जेवणानंतर गुळाचा चहा घेतल्याने पचन सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
advertisement
7/7
चहा बनवताना थोडा संयम आणि योग्य पद्धत वापरली, तर तुम्हाला साखरेपेक्षाही अधिक चविष्ट आणि आरोग्यदायी गुळाचा चहा घरच्या घरी घेता येईल. तर मग, उद्याचा चहा 'गुळाचा' करून पाहायला विसरू नका
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Jaggery Tea : गुळाचा चहा बनवताना दूध फाटतंय? 'या' सोप्या टिप्स वापरा; मिळेल साखरेपेक्षाही भारी चव अन् आरोग्य
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल