TRENDING:

पशुपालकांसाठी महत्त्वाची बातमी! मान्सूनच्या आगमनापूर्वी करा हे महत्त्वाचे काम, अन्यथा...

Last Updated:
जर तुम्हालाही जनावरांपासून चांगले दूध उत्पादन हवे असेल तर तुम्हाला मान्सूनच्या आधी काही सावधानी ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही योग्य ती काळजी नाही घेतली तर तुम्हाला 35-40 हजार रुपयांचे नुकसानही होऊ शकते. यामुळे मान्सूनचा पहिल्या पावसात जनावरांना अनेक प्रकारच्या आजारांचा धोका असतो. तर मग नेमकी काय काळजी घ्यावी, ते जाणून घेऊयात
advertisement
1/5
पशुपालकांसाठी महत्त्वाची बातमी! मान्सूनच्या आगमनापूर्वी करा हे महत्त्वाचे काम
रायबरेली येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय, शिवगड येथील प्रभारी अधिकारी डॉ. इंद्रजीत वर्मा (एमवीएससी वेटर्नरी) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, पावसाळ्यापूर्वी जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जनावरांना लसीकरण करून त्यांना जंतनाशक औषध देणे आवश्यक आहे. असे केल्याने पावसाळ्यात त्यांना कोणत्याही प्रकारच्या आजाराचा धोका राहणार नाही.
advertisement
2/5
पावसाळ्याच्या आगमनाने जनावरांना पायाचे व तोंडाचे आजार तसेच पोटात जंत व ताप येण्याचा धोका जास्त असतो, असेही ते म्हणाले.
advertisement
3/5
जनावरांच्या पोटात जंत असल्यास किंवा पायात व तोंडाला लागल्यास त्याचा थेट परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनावर होतो. त्यामुळे प्राणी सुस्त होऊन त्याचे शरीरही कमजोर होऊ लागते, अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
4/5
त्यामुळे तुमच्या जनावराचे लसीकरण आणि जंतमुक्त करण्यासाठी तुम्ही पशुवैद्यकीय रुग्णालयाशी संपर्क साधू शकता, असे आवाहनही त्यांनी केले.
advertisement
5/5
पण लसीकरणही करताना, तुमचे जनावर गर्भवती नसावे, ही काळजी घ्यावी. अन्यथा लसीकरणाचा थेट परिणाम जनावरांच्या गर्भाशयावरही होतो, असेही ते म्हणाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
पशुपालकांसाठी महत्त्वाची बातमी! मान्सूनच्या आगमनापूर्वी करा हे महत्त्वाचे काम, अन्यथा...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल