ना तेल ना मसाला, चवीसह आरोग्यसाठीही फायदेशीर, अगदी पटकन तयार होतं हे लोणचं कोणतं?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
तुम्ही अनेक प्रकारची लोणची खाल्ली असतील. लिंबाचे लोणेचेही तुम्ही अनेकदा खाल्ले असेल. मात्र, मसाला आणि तेल न वापरता लिंबाचे लोणचे कसे तयार केले जाते, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विशेष म्हणजे हे लोणचे चवीसह आरोग्यालाही फायदेशीर मानले जाते. (रजनीश कुमार यादव, प्रतिनिधी)
advertisement
1/7

जेवणात लोणच्याचे विशेष महत्त्व आहे. लोणचे हे जेवणाची चव वाढवते. मात्र, आरोग्याचा विचार केल्यावर लोणचे सोडावे लागते. पण एक लोणचे असे आहे ज्यात तेल आणि मसाला वापरला जात नाही.
advertisement
2/7
त्यामुळे हे आरोग्याला आणि चवीलाही उत्तम आहे. हे लिंबाचे लोणचे आहे. जर तुमच्याकडे लिंबू असतील तर तुम्ही हे लोणचे तयार करू शकतात.
advertisement
3/7
या लोणच्यातून तुम्हाला व्हिटामिन सी मिळेल. तसेच तुमची रोगप्रतिकारक क्षमताही मजबूत होईल.
advertisement
4/7
हे लिंबूचे लोणचे कसे तयार करतात - 4 किलो लिंबू, 500 ग्रॅम पांढरे मीठ, 200 ग्रॅम काळे मीठ, 100 ग्रॅम भाजलेले जिरे पावडर आणि 100 ग्रॅम काळी मिरी पावडर इतके साहित्य घ्यावे.
advertisement
5/7
लिंबू स्वच्छ धुवावे त्याने कपड्याने पुसून ओलावा काढण्यासाठी उन्हात ठेवावे. यानंतर त्याचे चार चौकोनी तुकडे करा. तुकडे तुकडे होणार नाहीत याची काळजी घ्या. कढईत जिरे मंद आचेवर भाजून पावडर बनवावे. यानंतर पांढरे मीठ, जिरे, काळी मिरी आणि काळे मीठ एकत्र मिसळावे.
advertisement
6/7
यानंतर लिंबाच्या तुकड्यात भरून बरणीत ठेवावे. नंतर बरणीवर पातळ कापड बांधून उन्हात ठेवावे. आठवडाभरात लिंबू वितळून खाण्यायोग्य होतील.
advertisement
7/7
प्रयागराजमध्ये या पद्धतीचा वापर करून लिंबाचे लोणचे बनवणारे रविप्रकाश मौर्य यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, आरोग्याचा विचार करता साधे मसाले घालून बनवलेले हे लोणचे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे लिंबाचे लोणचे कोणीही घरी तयार करू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
ना तेल ना मसाला, चवीसह आरोग्यसाठीही फायदेशीर, अगदी पटकन तयार होतं हे लोणचं कोणतं?