TRENDING:

लहान मुलांकडे दुर्लक्ष करू नका! सतत मोबाईल पाहणं ठरू शकतं धोकादायक

Last Updated:
सध्याच्या काळात अनेक मुलं सतत मोबाईल पाहात असतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये नैराश्य, चिंता आणि आत्मसन्मानाची कमी या सारख्या समस्या जाणवू शकतात.
advertisement
1/7
लहान मुलांकडे दुर्लक्ष करू नका! सतत मोबाईल पाहणं ठरू शकतं धोकादायक
सध्याच्या काळात मोबाईल ही जणू रोजची गरज झाली आहे. त्यामुळे मोबाईल वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा थेट परिणाम वापरकर्त्याच्या मानसिक आरोग्यावर होताना दिसून येतो. यामध्ये तरुणच नाही तर लहान मुलं देखील मोबाईच्या व्यसनाचे बळी पडत आहेत.
advertisement
2/7
तासनतास मोबाईल पाहण्यानं नैराश्य येऊ शकतं आणि यातून आत्महत्येसारखे टोकाचे निर्णयही घेतले जाऊ शकतात. याबाबत <a href="https://news18marathi.com/pune/">पुणे</a> येथील स्त्रीरोग आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन पवार यांनी माहिती दिलीय.
advertisement
3/7
मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये नैराश्य, चिंता आणि आत्मसन्मानाची कमी या सारख्या समस्या जाणवतात. तसेच एकटेपणाची जाणीव होते. झोपमोड होते. मानसिक चिंता, नैराश्य अशी लक्षणेही लहान मुलांमध्ये आढळून येतात.
advertisement
4/7
मोबाईल सतत पाहिल्यामुळे स्क्रीन टाईममध्ये वाढ होते. यामुळे डोळ्यांना ताण येणे, डोकेदुखी होणे अशा शारीरिक समस्या निर्माण होत आहेत, असं अनेक अभ्यासातून स्पष्ट झाल्याचं डॉक्टर पवार सांगतात.
advertisement
5/7
मोबाईलमधील गेम, सोशल मीडियाचा वापर देखील वाढतो आहे. स्नॅपचॅट, फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या ऍपमुळे ते इतरांशी तुलना करतात. लाईक, कमेंट आणि फॉलोअर्स याबाबत तुलना केल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. त्याचा परिणाम आत्महत्येसारखे विचार मनात येण्यात होत असल्याचे डॉक्टर पवार सांगतात.
advertisement
6/7
लहान मुलांना इलेक्ट्रिनिक गॅजेट्स आणि सोशल मीडियाच्या वापरापासून जास्तीत जास्त लांब ठेवणं गरजेचं आहे. आज आपण सोशल मीडिय मुळे अनेक मुलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे पाहत आहोत. यासाठी मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाणे, अभ्यास करून घेणे, इतर खेळ घेणे, तसच त्यांचं मानसिक आरोग्य कसं आहे? याची तपासणी जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घेणे गरजेचे आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले.
advertisement
7/7
शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थांना मोबाईलचा वापर होणार नाही, या प्रकारचं मार्गदर्शन करावं. मोबाईलचा वापर होणार नाही यासाठी पालकांनीही विविध उपाय करावेत. यात मुलांशी जास्तीत जास्त संवाद साधून खेळ घेणे, फिरायला घेऊन जाणे या गोष्टी केल्या पाहिजे. यामुळे निश्चितच त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते, अशी माहिती पुण्यातील डॉ. सचिन पवार यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
लहान मुलांकडे दुर्लक्ष करू नका! सतत मोबाईल पाहणं ठरू शकतं धोकादायक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल