Tips And Tricks : 'या' ट्रिकच्या मदतीने बनवा परफेक्ट गुलाबजाम; अजिबात फुटणार नाही, होतील मऊ आणि ज्युसी!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to make perfect Gulabjam : आपल्याकडे अनेक शुभ प्रसंगी गुलाबजाम बनवले जातात. लोकांना निमित्ताव्यतिरिक्तही ते खाया आवडतात. मात्र काहीवेळा हे गुलाबजाम फुटतात किंवा आतापर्यंत मऊ होत नाही, कच्चे राहतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहोत, ज्याद्वारे तुमचे गुलाबजाम अगदी मऊसूत आणि रसाळ बनतील.
advertisement
1/7

गुलाबजाम बनवताना सर्वात जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे सर्व साहित्याचं प्रमाण. साहित्य प्रमाणात असेल तर गुलाबजाम बिघडत नाही. चला पाहूया गुलाबजाम बनवण्याची सोपी आणि प्रमाणबद्ध रेसिपी.
advertisement
2/7
परफेक्ट गुलाबजामून बनवण्यासाठी तुम्हाला सर्व साहित्य वेगळ्या प्रमाणात घ्यावं लागेल. खवा 250 ग्रॅम, पनीर 50 ग्रॅम, मैदा 3 ते 4 टेबलस्पून, वेलची पावडर 1/2 टीस्पून, साखर 2 कप, पाणी 1.5 कप, तूप/तेल तळण्यासाठी एवढं साहित्य लागेल.
advertisement
3/7
सर्वात आधी पाक तयार करा. एका मोठ्या सॉसपॅनमध्ये साखर आणि पाणी एकत्र करा. हे मध्यम आचेवर उकळी येईपर्यंत गरम करा. थोडी वेलची पावडर आणि हवे असल्यास केशर घाला. पाक थोडा चिकट होईपर्यंत शिजवा.
advertisement
4/7
एका प्लेटमध्ये खवा आणि पनीर एकत्र बारीक करून मळून घ्या. त्यामध्ये मैदा आणि वेलची पावडर घाला. व्यवस्थित मळून मऊ कणिक तयार करा. तयार केलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्या.
advertisement
5/7
गोळ्यांना भेगा पडू नये आणि ते टाईट गोल आकारात यावे यासाठी हातांना तूप लावून गोळे तयार करा. यामुळे त्याला भेगा पडणार नाही. गुलाबजाम मळताना त्यांना भेगा पडल्या नाही की ते तळताना फुटत नाही.
advertisement
6/7
आता एका पॅनमध्ये तूप किंवा तेल गरम करा. गॅस कमी करून हळूहळू गोळे त्यात घाला. हे गोळे हलक्या हाताने हलवत राहा. जेणेकरून त्यांना सोनेरी तपकिरी किंवा काळा रंग येईल.
advertisement
7/7
तळलेले गुलाबजाम थेट गरम साखरेच्या पाकात घाला. त्यांना पाकामध्ये किमान 2 तास राहू द्या, जेणेकरून ते पाक शोषून घेतील. वरून सुका मेवा घाला आणि गरमागरम सर्व्ह करा. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : 'या' ट्रिकच्या मदतीने बनवा परफेक्ट गुलाबजाम; अजिबात फुटणार नाही, होतील मऊ आणि ज्युसी!