सावधान! चहासोबत 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका, अन्यथा होऊ शकतं लिव्हर खराब
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
चहा सोबत काही पदार्थ खाल्ल्यास आरोग्यास मोठे नुकसान होऊ शकते. मिठाचे पदार्थ, हिरव्या भाज्यांचे पदार्थ, बेसनाचे पदार्थ, ब्रेड आणि सुकामेवा हे चहा सोबत खाणे टाळावे. हे पदार्थ लिव्हरवर ताण आणतात, ॲसिडिटी वाढवतात आणि पचनावर विपरीत परिणाम करतात. त्यामुळे चहा सोबत योग्य पदार्थ निवडणे गरजेचे आहे.
advertisement
1/7

चहा अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बहुतेक लोकांच्या डोकेदुखीवर चहा हाच उपाय असतो. चहा प्यायल्यावर लोकं ऊर्जावान वाटतात आणि ताजेतवाने होतात. दुधाच्या चहासोबतच जगभरातील लोकं अनेक प्रकारचे चहा पितात. ग्रीन टी आणि ब्लॅक टीपासून कॅमोमाइल आणि हिबिस्कस टीपर्यंत चहाचे अनेक प्रकार आहेत.
advertisement
2/7
काही लोकांना चहासोबत बिस्किटे खायला आवडतात, तर काहींना भजी. पण काही गोष्टी अशा आहेत, ज्या चहासोबत कधीच खाऊ नयेत. जर तुम्ही या गोष्टी चहासोबत खाल्ल्या, तर त्यामुळे लिव्हर खराब होतं आणि ॲसिडिटी होते. चहासोबत कोणत्या गोष्टी खाऊ नयेत, ते जाणून घेऊया.
advertisement
3/7
चहासोबत खारट पदार्थ खाणं आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतं. चहासोबत जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी साचू शकतं. चिप्स, नमकीन किंवा बिस्किटांसारखे कॅन केलेले किंवा पॅक केलेले पदार्थ खाल्ल्याने फॅटी लिव्हर रोग आणि लठ्ठपणाची समस्या वाढू शकते.
advertisement
4/7
पराठा, भजी इत्यादी हिरव्या भाज्यांपासून बनवलेले पदार्थ खाताना चहा पिणं हानिकारक आहे. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने लिव्हरला ते पचायला त्रास होतो, ज्यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्या होऊ शकतात.
advertisement
5/7
अनेक लोकांना चहासोबत बेसनचे खारट पदार्थ खायला आवडतात, तर काही लोकं पावसाळ्यात भजी खातात. पण हे पदार्थ खाल्ल्याने पचनाच्या समस्या होतात आणि शरीराची पोषक तत्त्वं शोषून घेण्याची क्षमता कमी होते.
advertisement
6/7
अनेक लोकांना चहासोबत ब्रेड खायला आवडतो. पण हे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते आणि फॅटी लिव्हरही होऊ शकतं.
advertisement
7/7
अनेक लोकं चहासोबत ड्रायफ्रुट्स खातात, ज्यात भरपूर लोह असतं. मात्र, चहासोबत ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
सावधान! चहासोबत 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका, अन्यथा होऊ शकतं लिव्हर खराब