आजारी पडायचं नसेल तर भाजीपाला खरेदी करताना घ्या ही काळजी, नेमकं काय कराल?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
Vegetables : सध्या बाजारात भाजीपाल्या संदर्भात विविध व्हिडिओसुद्धा व्हायरल होत असतात. यामुळे भाजीपाला खरेदी करताना काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. अशावेळी नेमकी काय खबरदारी घ्यावी, हेच आपण जाणून घेऊयात. (दिपेंद्र कुमावत/नागौर, प्रतिनिधी)
advertisement
1/5

सध्या काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक साप हा टोमॅटोच्या झाडाला दंश करताना किदसत आहे. तर पत्ता कोबीच्या आतूनही साप निघाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाला खरेदी करताना काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
advertisement
2/5
डॉ. राजेश कुमार चौधरी यांनी याबाबत सांगितले की, पानकोबी खरेदी करताना वजनदार पानकोबी घ्यावी. यामध्ये छेद असू नये, हेसुद्धा तपासून घ्यावे. याशिवाय ब्रोकलीचा रंग हा हिरवा असावा. पिवळी ब्रोकली खरेदी करू नये.
advertisement
3/5
फूलकोबी खरे करताना फूल विखुरलेले नसावे. त्यात आतमध्ये कीटक वगैरे नसावे, हे तपासून घ्यावे. उकडलेल्या पाण्याने फुलकोबी चांगले धुवून घ्यावी. याशिवाय दुधी भोपळा हा फार पातळ किंवा जाड घेऊ नये. मध्यम आकाराचा सरळ आणि हलका भोपळा घ्यावा. तसेच जास्त पिकलेल्या भोपळ्याच्या बिया कडक असतात. तसेच शिजवल्यानंतरही नरम होत नाही.
advertisement
4/5
पातळ, लांब दोडके खरेदी करावेत. मध्यम किंवा लहान आकाराचे असावेत. जर तुम्हाला ते कापून बनवायचे असतील तर तुम्ही मोठे दोडकी खरेदी करू शकता. ते वर हिरवे असावेत. जास्त पिकलेल्या दोडक्यात बिया असतात. त्यामुळे ते खायला चवदार नसतात.
advertisement
5/5
भरताची वांगी खरेदी करताना हलकी वांगी घ्यावी. जास्त वजनाच्या वांग्यांमध्ये बिया असतात. जर कापून वांगी करायची असतील तर लांब वांगी घ्यावीत. वांगी गुळगुळीत आणि चमकदार असावेत. त्यात छिद्र नसावेत. वांग्यावरील देठ हिरवा असेल तर ते ताजी आहेत, असे समजावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
आजारी पडायचं नसेल तर भाजीपाला खरेदी करताना घ्या ही काळजी, नेमकं काय कराल?