TRENDING:

फक्त अभ्यासातच नाही, मुलं सगळ्यात होतील हुशार! त्यांना 'हे' 5 पदार्थ आवर्जून द्या

Last Updated:
डॉ. स्मिता श्रीवास्तव सांगतात की, आपलं संपूर्ण शरीर हे आपल्या आहारावर अवलंबून असतं. त्यामुळे जर आपल्या मुलांची बुद्धी तल्लख व्हावी असं वाटत असेल तर त्यांना जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त, व्हिटॅमिनयुक्त पदार्थ द्यावे. ज्यामुळे ते बुद्धिमान होतीलच, शिवाय त्यांचं शरीरही सुदृढ राहील. (सौरभ वर्मा, प्रतिनिधी)
advertisement
1/5
फक्त अभ्यासातच नाही, मुलं सगळ्यात होतील हुशार! त्यांना हे 5 पदार्थ आवर्जून द्या
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना दररोज दूध द्यावं. दुधात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीन असतं. ज्यामुळे मुलांची बुद्धी तल्लख होते.
advertisement
2/5
व्हिटॅमिन डी आणि प्रोटीनने परिपूर्ण असलेली अंडीसुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मुलांना दररोज अंडी द्यावी. अंड्यामुळे शरीर ऍक्टिव्ह राहतं. आपण मुलांना उकडलेली अंडी देऊ शकता किंवा अंड्याचे विविध पदार्थ बनवूनही देऊ शकता.
advertisement
3/5
काजू शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. काजूमध्ये भरपूर प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल असतं. मुलांना नाश्त्यात काजू दिले तर उत्तम. त्यामुळे त्यांचं मेंदू सुदृढ राहतं.
advertisement
4/5
हिरव्या भाज्या, मोड आलेली कडधान्यसुद्धा मेंदूच्या आरोग्यासाठी <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/this-bitter-plant-is-a-panacea-for-kidney-stones-mhij-1193008.html">उपयुक्त</a> ठरतात. आपण मुलांना विविध भाज्या बनवून किंवा सलाडमध्ये भाज्या देऊ शकता.
advertisement
5/5
माश्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, प्रोटीन, ओमेगा थ्री आणि फॅटी ऍसिड असतं. ज्यातून शरिराला भरपूर <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/have-herbal-tea-for-a-healthy-life-you-can-lose-weight-easily-mhij-1192739.html">फायदा</a> मिळतो. लहान मुलांना तर आवर्जून मासे द्यावे, कारण त्यामुळे मेंदू आणि संपूर्ण शरीर <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/heat-stroke-can-be-dangerous-for-babies-too-take-care-of-them-mhij-1192759.html">फिट</a> राहतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
फक्त अभ्यासातच नाही, मुलं सगळ्यात होतील हुशार! त्यांना 'हे' 5 पदार्थ आवर्जून द्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल