विसराळूपणासाठी फायदेशीर आहे ‘हा’ पदार्थ; रोज खा होतील आश्चर्यकारक फायदे
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
तंदरुस्त राहण्यासाठी रोज मखाना खाणं लाभदायी आहे.
advertisement
1/8

सध्याच्या धावपळीच्या काळात अनेकांचे आहार आणि आरोग्याकडे लक्ष नसते. त्यामुळे विविध आजार आणि शारीरीक व्याधींना सामोरं जावं लागतं. आहाराकडे योग्य लक्ष दिल्यास असे प्रसंग टाळता येऊ शकतात. तंदरुस्त राहण्यासाठी रोज मखाना खाणं लाभदायी आहे.
advertisement
2/8
मखाना म्हणजे फुल टाइमपास आणि पौष्टिक स्नॅक आहे. हे दिसायला पॉपकॉर्न सारखेच दिसतात. ते जेवढे खायला चविष्ट असतात तेवढेच आरोग्यासही चांगले असतात. याबद्दल <a href="https://news18marathi.com/maharashtra/chhatrapati-sambhaji-nagar/">छत्रपती संभाजीनगर</a> येथील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी महत्त्वपूर्ण माहिती सांगितलीय.
advertisement
3/8
मखाने खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मखाना खाण्याचा फायदा होतो. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील ते वाढत्या वयात असतील तर त्यांना किमान दररोज 10 ते 20 ग्रॅम मखाने खायला द्यायला पाहिजेत.
advertisement
4/8
वयात येणाऱ्या मुलींना आणि ज्या महिलांची मासिक पाळी जाणार आहे त्यांना कॅल्शियमची आवश्यकता असते. जर त्यांनी दररोज मखाने खाल्ले तर त्यांना या मखाण्यामधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम भेटतं, असं कर्णिक सांगतात.
advertisement
5/8
मखाने वेगवेगळ्या पद्धतीनं खाता येऊ शकतात. छान ड्राय रोस्ट करून ते खाऊ शकता. ते तळून बारीक करून त्यामध्ये गूळ घालून त्याचे लाडू देखील बनवता येतात. तुम्ही मखान्यांची ड्रायफ्रुट्स घालून खीर देखील करू शकता.
advertisement
6/8
ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांनी दररोज आपल्या आहारामध्ये किमान एक वाटी तरी मखाना खायला पाहिजे. मधुमेहींनी जर मखाने खाल्ले तर त्यांची जेवणानंतरची साखर लेव्हल आटोक्यात यायला मदत होते, असंही आहारतज्ज्ञ सांगतात.
advertisement
7/8
ज्यांना विसराळूपणा येतो किंवा प्रत्येक गोष्टीची आठवण करून द्यावी लागते अशा लोकांनी देखील मखाना खायला पाहिजे. यातून त्यांना कॅल्शियम भेटतं आणि ते त्यांना उपयुक्त ठरतं. विद्यार्थ्यांनी देखील आहारात मखाना खावा, असे आहारतज्ज्ञ कर्णिक सांगतात.
advertisement
8/8
(सूचना : येथे दिलेली माहिती आहार तज्ज्ञांचे वैयक्तिक मत आहे. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
विसराळूपणासाठी फायदेशीर आहे ‘हा’ पदार्थ; रोज खा होतील आश्चर्यकारक फायदे