Monsoon Health Tips: रोगप्रतिकार शक्ती वाढेल, ही 5 मसाले करा सेवन, आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आयुर्वेदानुसार काही स्वयंपाकघरातील मसाले नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करतात.
advertisement
1/6

पावसाळा सुरु झाला की हवामानात बदल होतो, दमटपणा वाढतो आणि संसर्गजन्य रोगांचा धोका अधिक वाढतो. या ऋतूत सर्दी, खोकला, ताप, अपचन यांसारखे त्रास सहज होतात.
advertisement
2/6
त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आयुर्वेदानुसार काही स्वयंपाकघरातील मसाले नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करतात. हे पाच प्रभावी मसाले कोणते आहेत पाहुयात.
advertisement
3/6
हळद: हळदीमध्ये कर्क्युमिन हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी घटक असतो. हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते, रक्तशुद्धी करते आणि सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गांपासून संरक्षण देते. उपयोग: रोज रात्री गरम दूधात हळद मिसळून घ्या.
advertisement
4/6
आलं: आलं हे नैसर्गिक अँटीबायोटिक आणि अँटीवायरल गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. पावसाळ्यात होणारा अपचनाचा त्रास, घशातील खवखव आणि सर्दी यावर आले खूप उपयुक्त आहे.उपयोग: आलं चहा किंवा गरम पाण्यात मधासोबत सेवन करा.
advertisement
5/6
मिरी : मिरी शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि श्वसन मार्ग स्वच्छ ठेवते. यातील पिपरिन हे घटक अन्नातील पोषकतत्त्वांचे शोषण वाढवते आणि रोगप्रतिकार शक्ती सुधारते. उपयोग: सूप, कढी किंवा चहामध्ये थोडी मिरी पूड टाका.
advertisement
6/6
तुळस: तुळस ही आयुर्वेदातील सर्वोत्कृष्ट औषधी वनस्पतींपैकी एक आहे. तिच्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. तुळस श्वसन संस्थेसाठी अत्यंत लाभदायक आहे.उपयोग: तुळशीची पाने उकळून चहा तयार करा किंवा रोज सकाळी 4–5 पाने चावून खा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Monsoon Health Tips: रोगप्रतिकार शक्ती वाढेल, ही 5 मसाले करा सेवन, आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त