TRENDING:

संत्र्याची साल सौंदर्याचा खजिना, पार्लरशिवाय मिळतो इन्स्टंट ग्लो! फेकण्याआधी विचार करा

Last Updated:
काही फळं आपण सालीसकट खातो पण बहुतेक फळांची साल फेकून देतो. खरंतर अनेक अशी फळं आहेत, ज्यांच्या साली आरोग्यासाठी उपयुक्त असतात. संत्र्याच्या सालीला तर सौंदर्याचा खजिना म्हणतात, असं नेमकं काय असतं या सालीत, जाणून घेऊया.
advertisement
1/5
संत्र्याची साल सौंदर्याचा खजिना, पार्लरशिवाय मिळतो इन्स्टंट ग्लो! फेकू नका
संत्र्याची फक्त चव भारी नसते, तर हे फळ आरोग्यासाठीही उत्तम आहे. खरंतर संत्र हा व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. त्यातून आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
advertisement
2/5
जसा संत्र्याचा गर आरोग्यासाठी फायदेशीर असतो, तशी संत्र्याची सालही उपयुक्त असते. या सालीत अनेक पोषक घटक दडलेले असतात. ज्यामुळे त्वचेवरील डाग, मुरूम दूर होण्यास मदत मिळते आणि त्वचा छान तजेलदार दिसते. या सालीमुळे अगदी पार्लरशिवाय इन्स्टंट ग्लो मिळू शकतो.
advertisement
3/5
झारखंडची राजधानी असलेल्या रांचीचे आयुर्वेदिक डॉक्टर व्हीके पांडे सांगतात, संत्र्याची साल केवळ त्वचेसाठीच नाही, तर हृदयासाठीही फायदेशीर असते. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहू शकतं. परिणामी हृदय सुदृढ राहतं. शिवाय यात असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे फुप्फुसांचं संसर्गापासून रक्षण होतं.
advertisement
4/5
डॉक्टर व्हीके पांडे म्हणाले, आरोग्यासाठी ऑरेंज टीसुद्धा खूप उपयुक्त ठरते. हा चहा बनवण्यासाठी संत्र्याची <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/you-will-never-throw-away-lemon-peels-after-reading-this-mhij-1226830.html">साल</a> पाण्यात उकळवून त्यात लिंबू आणि थोडं काळं मीठ घालावं. अशाप्रकारे तयार झालेली ऑरेंज टी प्यायल्यास <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/lose-your-weight-fast-with-weight-loss-fasting-mhij-1226781.html">वजन कमी होण्यास मदत</a> मिळते.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/why-does-weight-gain-suddenly-mhij-1227591.html">आरोग्याबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/food/fantastic-health-benefits-of-figs-l18w-mhij-1226947.html">डॉक्टरांचा सल्ला</a> घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
संत्र्याची साल सौंदर्याचा खजिना, पार्लरशिवाय मिळतो इन्स्टंट ग्लो! फेकण्याआधी विचार करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल