TRENDING:

घामाने बुटांचा घाण वास येतो? 5 सोप्या ट्रिक्स, ज्यामुळे बूट राहतील एकदम फ्रेश

Last Updated:
उन्हाळ्यात शरिरातलं पाणी वारंवार घामावाटे बाहेर पडतं. पायही ओलेचिंब होतात. अशात बुटांचा घाण वास येतो. बुटांचा वास घालवायचा कसा? यावर एकदम सोपे घरगुती उपाय पाहूया. (रिया पांडे, प्रतिनिधी / दिल्ली)
advertisement
1/5
घामाने बुटांचा घाण वास येतो? 5 सोप्या ट्रिक्स, ज्यामुळे बूट राहतील एकदम फ्रेश
बुटांचा वास घालवण्यासाठी एका वाटीत चमचाभर बेकिंग सोडा, चमचाभर बेकिंग पावडर आणि 2 चमचे कॉर्न स्टार्च घ्या. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून सॉक्समध्ये ठेवा आणि ते सॉक्स रात्रभर बुटात राहूद्या. बेकिंग सोडा सगळी दुर्गंधी शोषून घेईल आणि तुम्ही दिवसभर कोणत्याही चिंतेविना बूट वापरू शकाल.
advertisement
2/5
याव्यतिरिक्त कापसात लिंबाचा रस घेऊन बूट आतून व्यवस्थित पुसून घ्या. लिंबातील नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे काही तासांतच बूट फ्रेश होतात. तसंच स्प्रे बॉटलमध्ये 1 कप व्हिनेगर आणि 3 कप पाणी मिसळून बुटांमध्ये स्प्रे करा. बूट पूर्ण सुकल्यानंतर सगळी दुर्गंधी गेलेली असेल.
advertisement
3/5
लेव्हेंडर ऑइलनेही तुम्ही बुटांची दुर्गंधी दूर करू शकता. त्यासाठी कापसात लेव्हेंडर ऑइलचे काही थेंब घेऊन बुटांच्या आत लावा. त्यामुळे बुटं छान फ्रेश राहतील.
advertisement
4/5
टी बॅगनेसुद्धा तुम्ही बुटांच्या आतली दुर्गंधी दूर करू शकता. त्यासाठी टी बॅग गरम पाण्यात ठेवून बाहेर काढा. जेव्हा टी बॅग थंड होईल तेव्हा ती काही वेळासाठी बुटांच्या आत ठेवून द्या. त्यामुळे बुटांमधली सगळी दुर्गंधी आपोआप दूर होईल.
advertisement
5/5
बुटांची दुर्गंधी घालवण्याचा सर्वात <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/healthy-fruit-this-fruit-is-best-for-diabetes-and-hemorrhoids-benefits-of-bael-fruit-mhpj-1175698.html">सोपा उपाय</a> आहे बुटं काही वेळासाठी उन्हात ठेवा. त्यामुळे आतले सगळे <a href="https://news18marathi.com/lifestyle/interesting-facts-what-is-the-use-of-2-buttons-on-toilet-flush-tank-know-the-proper-usage-mhpj-1175661.html">विषाणू</a> नष्ट होऊन बुटं छान <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/how-often-should-you-apply-sunscreen-in-summer-what-is-the-correct-method-mhsz-1175621.html">फ्रेश</a> होतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
घामाने बुटांचा घाण वास येतो? 5 सोप्या ट्रिक्स, ज्यामुळे बूट राहतील एकदम फ्रेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल