TRENDING:

Interesting Facts : हॉटेलमध्ये चेक-इन करण्यासाठी 12 ते 2 हीच वेळ का असते? 'ही' रंजक कारणं तुम्हाला माहित नसतील

Last Updated:
Hotel check-in time importance : तुम्ही नेहमी नवीन शहर किंवा देशात प्रवास करत असाल आणि राहण्यासाठी हॉटेलमध्ये रूम बुक करत असाल तर चेक-इनचे नियम तुम्हाला नक्कीच माहित असतील. पण तुम्हाला हे माहित आहे का की, हॉटेलमध्ये चेक-इन दुपारी 12 ते 2 वाजताच का असतो? नसेल माहित, तर चला यामागची काही रंजक कारणे जाणून घेऊया.
advertisement
1/7
हॉटेलमध्ये चेकइनसाठी 12 ते 2 हीच वेळ का असते? ही रंजक कारणं तुम्हाला माहित नसतील
हॉटेलमध्ये चेक-इनची वेळ ठरलेली असण्यामागचे पहिले कारण हाऊसकीपिंगशी संबंधित असते. यात खोलीची स्वच्छता करण्यापासून ती व्यवस्थित लावण्यापर्यंतची सर्व कामे येतात, जेणेकरून पाहुणे येताच आराम करू शकतील.
advertisement
2/7
हाऊसकीपिंग : बहुतांश पाहुणे सकाळी 10 किंवा 11 वाजेपर्यंत चेक-आउट करतात. ते गेल्यानंतर स्वच्छता कर्मचारी खोल्यांची सखोल साफसफाई सुरू करतात. यात फक्त झाडू-पोछा नसून, खोल्या सॅनिटाइज करणे, चादरी बदलणे, बाथरूम साफ करणे आणि आवश्यक वस्तू भरून ठेवणे याचाही समावेश असतो.
advertisement
3/7
काम अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी जेव्हा सर्व हॉटेलमध्ये चेक-इनची वेळ निश्चित असते, तेव्हा रिसेप्शन स्टाफ, हाऊसकीपिंग आणि मॅनेजर यांना आपले काम नियोजनबद्ध पद्धतीने करणे सोपे जाते. त्यामुळे पाहुण्यांचा अनुभव चांगला राहतो.
advertisement
4/7
मेंटेनन्स : अनेकदा खोल्यांमधील छोट्या-मोठ्या बिघाड लगेच लक्षात येत नाहीत. चेक-आउट आणि चेक-इनमधील वेळेत मेंटेनन्स टीमला लाईट, नळ, सैल फिटिंग किंवा खराब उपकरणे दुरुस्त करण्याची संधी मिळते. तसेच सुपरवायझरही खोल्यांची तपासणी करतात.
advertisement
5/7
कामात घाई होऊ नये म्हणून हॉटेल लवकर चेक-इन स्वीकारत नाहीत. जर खूपच लवकर चेक-इनची परवानगी दिली, तर हॉटेलचे रोजचे काम विस्कळीत होऊ शकते, ज्यामुळे पाहुण्यांना त्रास होऊ शकतो. यासोबतच खोलीत राहणाऱ्या पाहुण्यांनाही रूम रिकामी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
advertisement
6/7
याशिवाय, हॉटेल हेही सुनिश्चित करतात की, एकाच वेळी जास्तीत जास्त खोल्या रिकाम्या होतील आणि चेक-इनसाठी तयार असतील. यामुळे संपूर्ण सिस्टीम मॅनेज आणि कंट्रोल करणे मॅनेजरसाठी सोपे होते.
advertisement
7/7
म्हणून पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या हॉटेल मॅनेजरकडे लवकर चेक-इनसाठी विनंती केली आणि त्यांनी तुम्हाला वेटिंग रूममध्ये थोडा वेळ थांबायला सांगितले किंवा थेट नकार दिला, तर त्यांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे नियम फक्त पाहुण्यांना चांगला अनुभव देण्यासाठीच पाळले जातात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Interesting Facts : हॉटेलमध्ये चेक-इन करण्यासाठी 12 ते 2 हीच वेळ का असते? 'ही' रंजक कारणं तुम्हाला माहित नसतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल