TRENDING:

ब्लूटूथ वारंवार का डिस्कनेक्ट होते? 'या' कारणांमुळे तुम्हाला प्रॉब्लम तर येत नाहीये ना

Last Updated:
ब्लूटूथ कनेक्शन वारंवार ड्रॉप होत राहणे हा एक प्रॉब्लमचअसतो. कारण यामुळे डिव्हाइस योग्य प्रकारे काम करु शकत नाही आणि यांना यूज करणे फ्रस्ट्रेटिंग होते.
advertisement
1/5
ब्लूटूथ वारंवार का डिस्कनेक्ट होते? 'या' कारणांमुळे येऊ शकतो प्रॉब्लम, पाहाच
तुम्हाला डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी लेबल आणि वायरचा झंझट ठेवायचं नसेल तर ब्लूटूथ सर्वात जास्त कामाची गोष्ट आहे. ब्लूटूथच्या माध्यमातून तुम्ही गाणे ऐकण्यापासून डेटा शेअर करणे आणि डिव्हाइस कंट्रोल करण्यापर्यंत अनेक कामं करु शकता. याचा वापर खुप सोपा आहे, मात्र अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे हे नीट काम करु शकत नाही. आज आपण जाणून घेऊया की, ब्लूटूथ वारंवार डिस्कनेक्ट का होते आणि यापासून बचावासाठी काय करावे?
advertisement
2/5
रेंजकडे लक्ष देणे गरजेचे : तुमचं ब्लूटूथ कनेक्शन वारंवार डिस्कनेक्ट होत असेल तर रेंजचा प्रॉब्लम येऊ शकतो. तुम्ही जुन्या स्पेसिफिकेशन्सचा ब्लूटूथ वापरत असाल तर याची रेंज जवळपास 33 फूट होते. यामुळे बाहेर गेल्यास कनेक्शन ड्रॉप होते. अनेकदा भींतीसारख्या फिजिकल ऑब्जेक्ट मध्येच आल्याने रेंज कमी होते. यामुळे प्रयत्न करा की, तुम्ही होस्ट डिव्हाइसची रेंज बाहेर जाऊ नये.
advertisement
3/5
इंटरफेरेंस देखील समस्या निर्माण करू शकतो : फिजिकल ऑब्जेक्ट आणि डिस्टेंसव्यतिरिक्त, इतर उपकरणांमधील हस्तक्षेपामुळे कनेक्शन तुटू शकते. ब्लूटूथ 2.4Ghz फ्रिक्वेन्सी वापरते, जी इतर अनेक वायरलेस उपकरणांद्वारे देखील वापरली जाते. हे कधीकधी मार्ग ब्लॉक करू शकते आणि तुमचे डिव्हाइस डिस्कनेक्ट होऊ शकते.
advertisement
4/5
सिंगल पॉइंट कनेक्शन : अनेक ब्लूटूथ डिव्हाइस एका वेळी फक्त एकाच डिव्हाइसशी कनेक्ट होऊ शकतात, तर काही प्राधान्य देतात. याचा अर्थ असा की जर तुम्ही एखाद्या डिव्हाइसजवळ आलात जे आधी कनेक्ट केलेले होते, तर ते मुख्य डिव्हाइसपासून डिस्कनेक्ट होऊ शकते आणि त्याच्याशी कनेक्ट होऊ शकते.
advertisement
5/5
बॅटरीने पडतो परिणाम : खुप कमी लोकांना हे माहिती असते की, डिव्हाइसची बॅटरी लाइफचाही ब्लूटूथ कनेक्शनवर परिणाम होतो. जर एखाद्या डिव्हाइसची बॅटरी लो असेल तर सिग्नल कमकुवत होते. ज्यामुळे ब्लूटूथ डिव्हाइस डिस्कनेक्ट होऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
ब्लूटूथ वारंवार का डिस्कनेक्ट होते? 'या' कारणांमुळे तुम्हाला प्रॉब्लम तर येत नाहीये ना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल