TRENDING:

मासिक पाळी चुकल्यावर किती दिवसांनी कळतं तुम्ही Pregnant आहात की नाही, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Last Updated:
पाळी चुकल्यानंतर काही दिवसांनी शरीर आपल्याला विशेष संकेत द्यायला सुरूवात करते. या लक्षणांकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास तुम्हाला गर्भधारणेबाबत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेता येऊ शकतात.
advertisement
1/8
मासिक पाळी चुकल्यावर किती दिवसांनी कळतं तुम्ही Pregnant आहात की नाही?
तुम्ही गरोदर आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी बाजारात अनेक प्रेग्नंसी टेस्ट किट्स उपलब्ध आहेत. मात्र काही शारिरीक लक्षणांच्या मदतीनेही आपण प्रेग्नंसी चेक करू शकतो. यातील एक मुख्य पद्धत म्हणजे पाळी चुकणे.
advertisement
2/8
पाळी चुकल्यानंतर काही दिवसांनी शरीर आपल्याला विशेष संकेत द्यायला सुरूवात करते. या लक्षणांकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास तुम्हाला गर्भधारणेबाबत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेता येऊ शकतात.
advertisement
3/8
गर्भधारणा झाल्यानंतर साधारणतः एक ते दोन आठवड्यांनी आपल्याला याची लक्षणे दिसू शकतात. मात्र मासिक पाळी चुकल्यानंतर हे अधिक स्पष्ट होते. प्रेग्नंसीची प्राथमिक लक्षणे कोणती आहेत ते जाणून घ्या.
advertisement
4/8
गर्भधारणेचे सर्वांत सामान्य आणि प्राथमिक लक्षण म्हणजे मासिक पाळी चुकणे. जर तुमची मासिक पाळी एक ते दोन आठवडे होऊनही येत नसेल तर हे गर्भधारणेचे लक्षण असू शकते.
advertisement
5/8
साधारणतः गर्भधारणा झाल्यानंतर १० ते १४ दिवसांनी स्पष्ट परिणाम दिसू लागतात. प्रेग्नंसी टेस्ट किट्समध्ये लघवीतील HCG (Human Chorionic Gonadotropin) हार्मोन तपासले जाते.
advertisement
6/8
गर्भधारणेच्या सुरूवातीच्या लक्षणांमध्ये महिलांमध्ये अनेक शारिरीक बदल दिसू शकतात. यामध्ये थकवा, मळमळ आणि ताप यासारख्या लक्षणांचा समावेश असू शकतो. ही लक्षणे सामान्यतः गर्भधारणेच्या 1 ते 2 आठवड्यांनंतर दिसू लागतात.
advertisement
7/8
स्त्रियांना अनेकदा त्यांच्या स्तनांमध्ये संवेदनशीलता किंवा सौम्य वेदना जाणवू शकतात. ही वेदना गर्भधारणेच्या 1 ते 2 आठवड्यांनंतर सुरू होऊ शकते. शरीरातील हार्मोनल बदलांचा हा परिणाम आहे.
advertisement
8/8
जर तुम्हाला गर्भधारणेमुळे मासिक पाळी येत नसेल तर त्यादरम्यान तुम्हाला वारंवार लघवी होण्याची समस्या भेडसावू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
मासिक पाळी चुकल्यावर किती दिवसांनी कळतं तुम्ही Pregnant आहात की नाही, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल