benefits of eating Eggs in Winter: हिवाळ्यात अंडी खाल्ल्याने काय होतं? दिवसाला किती अंडी खाणं फायद्याचं ?
- Published by:Tushar Shete
Last Updated:
benefits of eating Eggs in Winter:काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय अंड समन्वय समिती म्हणजेच NECC ने ‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’ अशी जाहिरात केली होती. कारण अंड्यामध्ये भरपूर प्रथिने असतात, ज्यामुळे अंड खाणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला कधीही प्रथिनांची कमतरता जाणवत नाही. जाणून घेऊयात हिवाळ्यात किती अंडी खावीत आणि अंडी खाण्याचे फायदे काय आहेत ते ?
advertisement
1/7

अंडी ही आरोग्यासाठी प्रचंड फायद्याची आहेत. हिवाळ्यात अंडी खाल्ल्याने शरीर आतून उबदार राहायला मदत होते. त्यामुळे फक्त मासांहारीच नाही तर अनेक शाकाहारी व्यक्तीसुद्धा अंडी खातात आणि ते स्वत:ला Eggetarian असं म्हणवून घेतात.
advertisement
2/7
अंड्यात प्रोटिन्ससह कॅल्शियमसुद्धा चांगल्या प्रमाणात आढळून येतं. त्यामुळे हिवाळ्यात होणाऱ्या सांधेदुखीच्या त्रासवर अंडी खाणं फायद्याचं मानलं जातं.
advertisement
3/7
नियमीतपणे व्यायाम करणाऱ्या व्यक्ती, बॉडी बिल्डर्स हे नाश्त्यामध्ये अंडीच खाणं पसंत करतात. मात्र ते अंड्यातला पिवळा बलक खात नाहीत.
advertisement
4/7
अंड्यातल्या पिवळ्या बलकामध्ये कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे ते खाल्ल्याने वजन वाढण्याची भीती असते. म्हणून शरीराला प्रोटिन्स आणि कॅल्शियम मिळवताना वजन वाढू नये यासाठी अनेक जण अंड्याचा पांढरा भाग खातात.
advertisement
5/7
गावठी अंडी आणि इंग्लिश अंडी असे अंड्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. गावठी अंडी ही तपकिरी रंगाची असतात तर इंग्रजी किंवा बॉयलर अंडी ही पांढऱ्या रंगाची असतात. गावठी अंडी ही इंग्लिश अंड्यापेक्षा महाग असतात.
advertisement
6/7
जसे अंड्याचे प्रकार आहेत तसे अंडी खाण्याचे सुद्धा प्रकार आहेत. काही जण अंडी ही दुधात फेटून खातात तर काही जण कच्ची अंडी खातात.
advertisement
7/7
गावठी अंड्यामध्ये अंड्यांमध्ये प्रोटीन्ससह कॅल्शियम आणि कॅलरीज जास्त असतात त्यामुळे आजारी गावठी अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तुम्ही जर पूर्ण अंड खाणार असाल तर एक अंड तुम्ही रोज खाऊ शकता. मात्र तुम्ही अंड्यातला पिवळा बलक खाणार नसाल तर तुम्ही रोज 4 अंडी खाऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
benefits of eating Eggs in Winter: हिवाळ्यात अंडी खाल्ल्याने काय होतं? दिवसाला किती अंडी खाणं फायद्याचं ?