Summer Tips : गार गार हवा देणारा कूलर देऊ शकतो विजेचा शॅाक, तुम्हाला हे माहितेय का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
कूलरमध्ये पाणी टाकताना विजेचा शॉक लागण्याचा धोका संभवतो. त्यामुळे कूलरचा वापर करण्यापूर्वी संपूर्ण वायरिंग नीट आहे की नाही हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
1/7

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की घराघरात कूलर आणि फॅन यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो. चटके देणाऱ्या उन्हापासून थोडा आराम मिळावा यासाठी प्रत्येकजण आपल्या सोयीप्रमाणे थंडावा शोधतो.
advertisement
2/7
मात्र या थंडावा देणाऱ्या साधनांमध्ये योग्य काळजी न घेतल्यास मोठा अपघात होऊ शकतो. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील इलेक्ट्रीशियन अरुणकुमार चव्हाण यांनी याच पार्श्वभूमीवर कूलर वापरतानी घ्यायच्या काळजीबदल माहिती दिली आहे.
advertisement
3/7
अरुण कुमार चव्हाण सांगतात की, उन्हाळ्यात कूलरचा वापर करताना सर्वप्रथम त्याच्या वायरिंगची तपासणी करावी. अनेक वेळा आपण कूलर इकडून तिकडे हलवताना वायर तुटते, दाबली जाते किंवा काही ठिकाणी कट होते. अशा परिस्थितीत कूलरमध्ये पाणी टाकताना विजेचा शॉक लागण्याचा धोका संभवतो. त्यामुळे कूलरचा वापर करण्यापूर्वी संपूर्ण वायरिंग नीट आहे की नाही हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
4/7
ते पुढे सांगतात की, दरवर्षी कूलरच्या बाजूंना असलेल्या जाळ्यांचीही तपासणी करावी. या जाळ्यांमुळे धूळ, माती आणि इतर घाण थेट फॅनमध्ये जात नाही. मात्र या जाळ्या अनेक वेळा गंजतात, तुटतात आणि त्यातून थेट फॅनमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे दरवर्षी कूलरच्या जाळ्या बदलून नवा थर लावावा, ज्यामुळे कूलरची कार्यक्षमता वाढते आणि थंडी अधिक चांगल्या प्रकारे मिळते.
advertisement
5/7
कूलरमध्ये असलेल्या पाण्याची नळी ही देखील काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे. ही नळी जुनी असल्यास तिला गळती लागू शकते, त्यामुळे पाण्याचा साठा नीट राहत नाही आणि कूलरची मोटर जळण्याची शक्यता असते. नवीन नळी बसविल्यास गळती होण्याचा धोका टळतो आणि कूलरचा वापर दीर्घकाळासाठी करता येतो.
advertisement
6/7
कूलर सुरू असताना त्याच्याजवळ लहान मुले, पाळीव प्राणी वा पाण्याचे भांडे ठेवणे टाळावे. कूलरच्या संपर्कात पाणी किंवा कोणताही धातू गेला, तर विजेचा झटका लागू शकतो. त्यामुळे कूलर सुरक्षितपणे, योग्य काळजीपूर्वक आणि आवश्यक तपासणीनंतरच वापरणे हे आपल्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे, असं अरुणकुमार चव्हाण सांगतात.
advertisement
7/7
या प्रकारच्या छोट्या पण महत्त्वाच्या सल्ल्यांमुळे आपण उन्हाळ्यात थंडावा तर मिळवू शकतोच पण कोणत्याही अपघातापासूनही स्वतःला आणि आपल्या परिवाराला वाचवू शकतो. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात कूलर वापरताना ही खबरदारी अवश्य घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Summer Tips : गार गार हवा देणारा कूलर देऊ शकतो विजेचा शॅाक, तुम्हाला हे माहितेय का?