Flight Ticket Booking : अगदी स्वस्तात मिळेल प्लेन तिकीट, बुक करताना फॉलो करा या 10 ट्रिक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Cheapest Flight Ticket Booking Tips : प्लेनचा प्रवास सगळ्यांनाच परवडतो असं नाही. पण आता आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला प्लेनचं तिकीट अगदी स्वस्तात मिळेल.
advertisement
1/11

एप्रिल, मे शाळा-कॉलेजना उन्हाळी सुट्ट्यांचे महिने. त्यामुळे या कालावधीत पालक मुलांना घेऊन फिरायला जातात. कितीतरी कुटुंब देशविदेशात फिरण्याचा प्लॅन करतात. पण लांब ठिकाणी फिरायचं म्हटलं की त्यासाठी प्रवासाचा उत्तम पर्याय म्हणजे प्लेन. पण प्लेनचा प्रवास सगळ्यांनाच परवडतो असं नाही. पण आता आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला प्लेनचं तिकीट अगदी स्वस्तात मिळेल.
advertisement
2/11
प्लेन तिकीट सर्च करताना इनकॉग्निटो मोडमध्ये सर्च करा. एखादी गोष्ट वारंवार सर्च केल्याने वेबसाईट आपली अॅक्टिव्हिटी ट्रॅक करतं, मग भाडं वाढतं.
advertisement
3/11
शक्य तितक्या लवकर तिकीट बुक करा. जितक्या लवकर बुकिंग कराल तितके स्वस्त होईल. कारण प्रवासाची तारीख जसजशी जवळ येते तसतसे तिकिटांचे दर वाढत जातात.
advertisement
4/11
आठवड्याच्या मध्यभागी तिकिटं सहसा स्वस्त असतात. त्यामुळे मंगळवार आणि बुधवारी यादिवशी बुक करा आणि पैसे वाचवा.
advertisement
5/11
जर तुमची प्रवासाची तारीख आणि वेळ फ्लेक्सिबल असेल तर तुम्हाला एक चांगला डील मिळू शकेल.
advertisement
6/11
ऑफ-पीक तासांच्या म्हणजे सकाळी लवकर किंवा रात्री उशिराच्या फ्लाइट्स स्वस्त असतात. थोड्याशा गैरसोयीमुळे मोठी बचत होऊ शकते.
advertisement
7/11
बऱ्याचदा एअरलाइनच्या साइट किंवा अॅपवर अशा खास ऑफर्स असतात ज्या थर्ड पार्टी साइटवर उपलब्ध नसतात.
advertisement
8/11
इंडिगो, एअर इंडियासारख्या विमान कंपन्या आपल्या प्रवाशांना लॉयल्टी पॉइंट्स देतात. हे पॉइंट्स तुमचा पुढचा प्रवास खूपच स्वस्त करू शकतात.
advertisement
9/11
क्रेडिट/डेबिट कार्ड, UPI आणि वॉलेटवर सवलती आणि कॅशबॅकसारख्या ऑफर बुकिंग आणखी स्वस्त करतात.
advertisement
10/11
गुगल फ्लाइट्स किंवा स्कायस्कॅनर सारख्या प्लॅटफॉर्मवर तिकीट ट्रॅक करण्यासाठी प्राइस अलर्ट ऑन करा. किमती कमी होताच, तुम्हाला नोटिफिकेशन येईल.
advertisement
11/11
मेकमायट्रिप, गोइबिबो, क्लिअरट्रिप आणि स्कायस्कॅनरसारख्या साइट्सवर एकाच फ्लाइटसाठी वेगवेगळे दर मिळू शकतात. इथं तुलना करा आणि सर्वात स्वस्त पर्याय निवडा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Flight Ticket Booking : अगदी स्वस्तात मिळेल प्लेन तिकीट, बुक करताना फॉलो करा या 10 ट्रिक