TRENDING:

Summer Hacks : उन्हाळ्यात कितीही घाम आला तरी 24 तास शरीरातून सुगंधच येईल, ट्राय करा 6 घरगुती उपाय

Last Updated:
उन्हाळा सुरु झाला असून या वातावरणात घराबाहेर पडल्यास संपूर्ण शरीर घामाघूम होते. अशावेळी घाम आल्याने अंगातून दुर्गंधी येऊ लागते परिणामी इतर लोकांना देखील याचा त्रास होतो. तेव्हा काही घरगुती उपायांनी तुम्ही अंडरऑर्म्स मधून येणाऱ्या दुर्गंधी पासून सुटका मिळवू शकता.
advertisement
1/5
उन्हाळ्यात कितीही घाम आला तरी 24 तास शरीरातून सुगंधच येईल, ट्राय करा घरगुती उपाय
शरीरात पाण्याची आणि मॅग्नेशियमची कमतरता झाल्याने दुर्गंधी येण्याची समस्या जाणवते. अशावेळी तुम्ही अँपल साइडर विनेगरमध्ये नारळाचे तेल मिसळून अंडरऑर्म्समध्ये लावू शकता. यामुळे अंडरऑर्म्समध्ये असलेले बॅक्टेरिया दूर होतात आणि येथून येणार बॅड स्मेल देखील गायब होतो.
advertisement
2/5
अंडरआर्म्समधून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. लिंबू कापून त्यातील एक भाग हा 10 मिनिटे अंडरआर्म्सवर चोळा. लिंबाचा असणाऱ्या पोषकतत्वामुळे जंतू निघून जातात. काहीवेळाने अंडरआर्म्स पाण्याने धुवून टाका अशाने दुर्गंधीपासून सुटका मिळते.
advertisement
3/5
बेकिंग सोडा देखील अंगाची दुर्गंधी सूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. एक चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात थोडा लिंबाचा रस मिसळा आणि 15 मिनिटे अंडरआर्म्सवर लावून ठेवा. मग पाण्याने धुवून टाका यामुळे काखेतून येणार बॅड स्मेल निघून जाईल.
advertisement
4/5
उन्हाळयात अंडरआर्म्समधून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही अंघोळ करताना तुरटी ओली करून तिला अंडरआर्म्सवर घासा आणि 5 मिनिटे तसेच राहू द्या. मग पाण्याने अंघोळ करा. अंडरआर्म्समधून येणारी दुर्गंधी रोखण्यासाठी तुम्ही रात्री झोपताना अंडरआर्म्सवर एलोवेरा जेल लावून झोपू शकता आणि सकाळी उठून धुवून टाका.
advertisement
5/5
सदर मजकूर हा इंटरनेटवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा त्वचेवर कोणत्याही गोष्टींचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Summer Hacks : उन्हाळ्यात कितीही घाम आला तरी 24 तास शरीरातून सुगंधच येईल, ट्राय करा 6 घरगुती उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल