TRENDING:

परफेक्ट पुऱ्या कशा बनवायच्या? पिठ मळताना फक्त ही एक गोष्ट टाका, मग तेलही लागेल कमी

Last Updated:
पुऱ्या गोल-गोल फुगलेल्या झाल्या की, खाण्याची मजा दुप्पट होते. मऊ आणि फुगलेल्या पुऱ्या असतील तर लोक एका बैठकीत 10-12 पुऱ्या खाऊन टाकतात.
advertisement
1/7
परफेक्ट पुऱ्या कशा बनवायच्या? पिठ मळताना फक्त ही गोष्ट टाका, मग तेलही लागेल कमी
तुम्ही दररोज पोळी, पराठा खात असाल, पण कधीतरी गरम आणि गोल-गोल फुगलेल्या पुऱ्या खाण्याची इच्छा होतेच. अनेकदा लोक वीकेंडला पुऱ्या बनवतात. लहान असो वा मोठे, पुऱ्या खायला सर्वांनाच आवडतात. विशेषतः, नाश्त्याला पुरी-भाजी खाणे हा एक चविष्ट कॉम्बिनेशन मानला जातो. पुऱ्या गोल-गोल फुगलेल्या झाल्या की, खाण्याची मजा दुप्पट होते. मऊ आणि फुगलेल्या पुऱ्या असतील तर लोक एका बैठकीत १०-१२ पुऱ्या खाऊन टाकतात.
advertisement
2/7
पण प्रत्येकवेळी पुऱ्या चांगल्या येतातच असं नाही. अशावेळी गृहिणींना प्रश्न पडतो की असं काय चुकलं की पुऱ्या फुगत नाहीत किंवा कडक होतात? किंवा काय केल्याने पुऱ्या चांगल्या होतील. शिवाय पुऱ्या तेलही कमी शोषलं जाईल, ज्यामुळे ती थोड्याप्रमाणात का होईना हेल्दी राहिल. म्हणून, सर्वात महत्त्वाचे आहे, पीठ व्यवस्थित मळणे. पिठात फक्त एक गोष्ट मिसळल्यास तुमच्या पुऱ्याही अतिशय मऊ आणि फुगलेल्या बनू लागतील.
advertisement
3/7
पुरी बनवण्यासाठी पीठ मळताना करा 'हे' कामतुम्ही जेव्हा जेव्हा पुरी बनवता, तेव्हा तुमच्या पुऱ्या खूप तेल शोषून घेतात का? पुरी फुगत नाही आणि कडक होते, ज्यामुळे ती खाण्यायोग्य राहत नाही का? तर, पीठ मळताना ही छोटीशी युक्ती वापरून पाहा. यामुळे तुमच्या पुऱ्या जास्त तेल शोषून घेणार नाहीत आणि परफेक्ट फुगतीलही.
advertisement
4/7
तुम्हाला तेलापासून दूर राहायचे आहे, पण पुरी खाण्याची इच्छा आहे, तर तुम्ही पुरीच्या पिठात थोडेसे तांदळाचे पीठ (Rice Flour) मिसळा. पुरी बनवण्यासाठी गव्हाचे पीठ वापरले जाते, पण पुऱ्या जास्त तेल शोषू नयेत यासाठी तुम्ही गव्हाच्या पिठात थोडेसे (सुमारे 1-2 चमचे) तांदळाचे पीठ मिसळून पाहा.
advertisement
5/7
तांदळाचे पीठ मिसळल्याने काय होते?जेव्हा तुम्ही गव्हाच्या पिठात तांदळाचे पीठ मिसळता, तेव्हा ते कमी तेल शोषून घेते. तांदळाचे पीठ पिठामध्ये अतिरिक्त ग्लूटेन तयार होण्यास प्रतिबंध करते. यामुळे पीठ जास्त लवचिक होत नाही आणि पुऱ्या कमी तेल शोषून घेतात.
advertisement
6/7
परफेक्ट पुरी बनवण्याची युक्तीटेक्सचर आणि आकार: तांदळाचे पीठ पुऱ्यांना उत्कृष्ट पोत (Texture) आणि आकार देते.टम्म फुगतील: गरम तेलात टाकताच प्रत्येक पुरी व्यवस्थित फुगते.थंड झाल्यावरही मऊ: थंड झाल्यावरही त्या मऊ राहतात.क्रिस्पीनेस: गव्हाच्या पिठात मैदा मिसळल्याने पुऱ्या हलक्याशा खुसखुशीतही बनतात.
advertisement
7/7
पीठ कसे मळावे?गव्हाचे पीठ आणि तांदळाचे पीठ घ्या.मिसळा: यात चवीनुसार मीठ आणि थोडेसे तेल किंवा तूप मिसळा. (तेल मिसळल्याने पुऱ्या मऊ राहतात.)गरम पाण्याचा वापर करून पीठ मळा. (पुरीसाठी पीठ घट्ट आणि कडक मळावे लागते.)पीठ मळल्यानंतर ते 20 ते 30 मिनिटे झाकून ठेवा. यामुळे पुऱ्या अधिक चांगल्या फुगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
परफेक्ट पुऱ्या कशा बनवायच्या? पिठ मळताना फक्त ही एक गोष्ट टाका, मग तेलही लागेल कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल