TRENDING:

Soft Chapati Tips : नरम आणि लुसलुशीत चपाती पाहिजे? जास्त कष्ट घ्यायचेच नाही फक्त 'या' 2 गोष्टी लक्षात ठेवा

Last Updated:
how to make chapati soft : आज आम्ही अशा काही घरगुती आणि सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्या तुमची चपाती मऊ, हलकी आणि लुसलुशीत बनवण्यास मदत करतील.
advertisement
1/9
नरम आणि लुसलुशीत चपाती पाहिजे? जास्त कष्ट घ्यायचे नाही फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा
घरात रोज भात, डाळ, भाजीसोबत पोळी (चपाती) करणं ही अनेक महिलांसाठी नेहमीची गोष्ट आहे. पण खरं सांगायचं तर, प्रत्येक वेळी चपाती परफेक्ट बनवणं हे तसं सोपं काम नाही. काही वेळा ती छान फुलते, तर कधी कडक किंवा कोरडी होते. काही वेळा तर कितीही प्रयत्न केले तरी चपाती कडकच बनते आणि मग मनात येतं “अगं, आज काय चुकलं बरं?”
advertisement
2/9
अशा वेळी "मऊ, लुसलुशीत आणि पचायला हलकी चपाती कशी बनवावी?" हा प्रश्न जवळपास प्रत्येक गृहिणीच्या मनात फिरत असतो. कारण घरच्यांच्या ताटात गरमागरम आणि मऊसर चपाती ठेवणं, ही केवळ सवय नाही ती प्रत्येक स्त्रीच्या स्वयंपाकातील आत्मसंतोषाची गोष्ट असते.
advertisement
3/9
पण काळजी करु नका आम्ही तु्म्हाला दररजो मऊ चपाती बनवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत.
advertisement
4/9
अनुभवी कुक ट्विंकल यांच्या मते, चपाती मऊ, पातळ आणि स्वादिष्ट बनवायची असेल, तर पिठ मळताना काही छोट्या पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
advertisement
5/9
पिठ मळताना त्यात एक चिमूटभर मीठ आणि थोडी साखर खाला. साखर पावडर स्वरूपात घालणे उत्तम ठरतं. यामुळे पिठ अधिक लवचिक आणि मऊ बनतं.
advertisement
6/9
मळलेलं पिठ अर्धा तास झाकून ठेवा – पिठ मळून झाल्यावर ते स्वच्छ सुती कपड्याने झाकून ठेवावं. यामुळे त्यात नैसर्गिक फर्मेंटेशन होतं आणि चपातीच्या मऊपणात फरक जाणवतो.
advertisement
7/9
काळं मीठ वापरून बघा – साध्या मिठाऐवजी काळं मीठ वापरल्यास चपाती केवळ मऊच होत नाही, तर ती पचायलाही हलकी ठरते. काळ्या मिठातील नैसर्गिक खनिजे पचनसंस्था सक्रिय ठेवतात आणि गॅस किंवा अपचनाची समस्या कमी करतात.
advertisement
8/9
चपाती मऊ व्हावी म्हणून महागडे घटक किंवा विशेष तंत्राची गरज नाही. फक्त योग्य प्रमाणात मीठ, थोडीशी साखर किंवा गूळ आणि पिठाला थोडा वेळ झाकून ठेवणं एवढं केल्यानेच तुमच्या चपाती नेहमीच सॉफ्ट, हलकी आणि चविष्ट बनेल.
advertisement
9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी त्याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Soft Chapati Tips : नरम आणि लुसलुशीत चपाती पाहिजे? जास्त कष्ट घ्यायचेच नाही फक्त 'या' 2 गोष्टी लक्षात ठेवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल