How To Store Mango : सिझन संपल्यानंतरही आंबा खायचाय? अशाप्रकारे साठवा, अनेक महिने राहील फ्रेश
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
उन्हाळ्यात तर आपण आंबे खातोच पण काही लोकांना आंबे इतके आवडतात की त्यांना ते आंब्याचा सिझन संप्यानंतरही खावेसे वाटतात. या लोकांना मग बाजारातील पॅकेज्ड मँगो ज्यूस घ्यावा लागतो. मात्र त्याला आंब्याची सर नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही आंबे साठवल्यास तुम्ही ते सीझननंतरही खाऊ शकता.
advertisement
1/9

उन्हाची चाहूल लागताच अनेक प्रकारचे आंबे बाजारात दाखल होतात, काही लोक कच्च्या कैरीची चटणी, लोणचे इ. तर काही जण पिकलेल्या आंब्यापासून बनवलेले शेक, कस्टर्ड आणि आईस्क्रीम आवडतात.
advertisement
2/9
काही लोक खूप जास्त आंबे एकाचवेळी विकत घेतात. नंतर ते कसे साठवावे, असा प्रश्न त्यांना पडतो. पण आम्ही तुम्हाला अशी एक युक्ती सांगतो, ज्याद्वारे तुम्ही आंबे साठवून कधीही मँगो स्मूदी, आईस्क्रीम, कस्टर्ड आणि शेक्सचा आस्वाद घेऊ शकता.
advertisement
3/9
चार-पाच दिवस <a href="https://news18marathi.com/lifestyle/right-time-and-method-to-eat-mango-take-care-of-these-things-to-avoid-harm-mhpj-1166852.html">आंबे</a> कसे साठवायचे : फक्त चार-पाच दिवस आंबे चांगले ठेवायचे असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवता येतात. आंबे उष्णतेत ठेवले तर ते कुजतात, त्यामुळे त्यांची चवही बिघडते. जर तुम्हाला चार ते पाच दिवस आंबे ठेवायचे असतील तर थोडे कडक आंबे विकत घ्या, जे फ्रीजमध्ये बरेच दिवस ठेवता येतील.
advertisement
4/9
आंबे साठवण्याची खास पद्धत : तुम्ही आंबे अगदी खास पद्धतीने साठवून ठेवले तरी ते अनेक दिवस खाता येऊ शकतात. जर तुम्हाला आंब्याचे तुकडे खायला आवडत असतील तर तुम्ही ते सोलून त्याचे मोठे तुकडे करू शकता.
advertisement
5/9
त्यानंतर यातील कोय वेगळी करा. आंब्याचे हे तुकडे हवाबंद डब्यात ठेवा, झाकण बंद करा आणि हा डबा फ्रीजमध्ये ठेवा. अशा प्रकारे तुम्ही अनेक दिवस <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/why-should-you-soak-mangos-in-water-before-eating-know-reason-in-marathi-mhpp-1159135.html">आंबे</a> खाऊ शकता आणि ते पुन्हा पुन्हा सोलण्याचा त्रासही होणार नाही.
advertisement
6/9
जास्त काळ आंबा कसा साठवायचा : जर तुम्हाला मँगो आईस्क्रीम खाण्याची किंवा मँगो शेक पिण्याची आवड असेल तर तुम्ही आंबा वेगळ्या पद्धतीने साठवू शकता. त्यासाठी प्रथम आंब्याचा पल्प बनवा. त्यासाठी तुम्हाला आंब्याचा पल्प काढून मिक्सरमध्ये चांगला बारीक करून घ्यावा लागेल.
advertisement
7/9
विशेष म्हणजे यात थोडेही पाणी घालू नये हे लक्षात ठेवावे. नाहीतर आंब्याचा पल्प खराब होईल. त्यानंतर, लगदा काचेच्या बाटलीत किंवा हवाबंद डब्यात पॅक करा आणि जेव्हा वाटेल तेव्हा मँगो शेक किंवा आईस्क्रीम बनवा.
advertisement
8/9
सीझन संपल्यानंतर आंबा खाण्यासाठी तो असा साठवा : सीझन संपल्यानंतरही आंबा खायचा असेल तर आंब्याचा पल्प काढून त्याची प्युरी बनवा. ही प्युरी बर्फाच्या ट्रेमध्ये भरून बर्फाचे तुकडे बनवा. आता प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद बॉक्समध्ये हे बर्फाचे तुकडे भरून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. त्यामुळे आंब्याची चव खराब होणार नाही आणि तुम्ही सिझन संपल्यानंतरही आंबे खाऊ शकता.
advertisement
9/9
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
How To Store Mango : सिझन संपल्यानंतरही आंबा खायचाय? अशाप्रकारे साठवा, अनेक महिने राहील फ्रेश