ICMR guideline : जेवणाच्या आधी आणि नंतर किती वेळ चहा-कॉफी पिऊ नये?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
भारतीयांमध्ये निरोगी खाण्याच्या सवयी सुधारण्यासाठी ICMR ने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या सहकार्याने अलीकडे 17 नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामध्ये जेवणाच्या आधी आणि नंतर किती वेळ चहा-कॉफी पिऊ नये. याबद्दल माहिती दिली आहे.
advertisement
1/6

खूप जास्त चहा किंवा कॉफी पिणे शरीरासाठी हानिकारक असते, हे अनेकांना माहीत आहे. यावेळी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसोर्सेस किंवा ICMR ने मार्गदर्शक तत्त्वांसह चहा आणि कॉफी घेण्याबाबत चेतावणी दिली.
advertisement
2/6
ICMR ने नुकतीच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या सहकार्याने भारतीयांमध्ये निरोगी खाण्याच्या सवयी सुधारण्यासाठी 17 नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वे <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health-tips-put-pinch-of-this-substance-in-tea-to-make-it-healthy-drink-and-beneficial-for-health-mhpj-1184581.html">चहा</a> आणि कॉफी पिण्याच्या सवयींमध्ये बदल सुचवतात.
advertisement
3/6
चहा, कॉफीमध्ये कॅफिन असते. ICMR मार्गदर्शक तत्त्वानुसार, दररोज 300 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिन शरीरात प्रवेश करू नये. तसेच, चहा आणि कॉफीमध्ये टॅनिन असतात, ज्यामुळे शरीराची लोह शोषण्याची क्षमता कमी होते.
advertisement
4/6
म्हणूनच ICMR च्या मार्गदर्शक तत्त्वात असेही म्हटले आहे की, जेवणाच्या आधी आणि नंतर किमान 1 तास चहा किंवा कॉफी पिऊ नये. ज्यामुळे ॲनिमिया होऊ शकतो. जास्त कॉफी प्यायल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या समस्याही उद्भवतात.
advertisement
5/6
त्या गाइडलाइनमध्ये मात्र दुधाशिवाय चहा प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते, असे म्हटले आहे. इतकेच नाही तर डोळ्यांच्या समस्या आणि पोटाच्या कर्करोगाचा धोकाही कमी होतो.
advertisement
6/6
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
ICMR guideline : जेवणाच्या आधी आणि नंतर किती वेळ चहा-कॉफी पिऊ नये?