Tricks And Tips : अचानक जॅकेटची चेन अडकलीय? 'या' ट्रिक वापरून पाहा, काही सेकंदात होईल मोकळी..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to unstuck Jacket zipper : काहीवेळा आपण घाईघाईमध्ये कपडे घालतो आणि अचानक जॅकेट किंवा इतर कपडे ज्यांना चेन असते, ते घालताना चेन अडकते. यावेळी त्या चेनला जास्त जोर लावला तर तुटूही शकते. म्हणून ती सहज मोकळी करता यायला हवी.
advertisement
1/7

जॅकेटची चेन अडकल्यावर ती मोकळी करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत. यामुळे चेनचं काही नुकसानही होणार नाही आणि तुमचाही जास्त वेळ वाया जाणार नाही. चेन अगदी सहज मोकळी होईल.
advertisement
2/7
जीन्स किंवा जॅकेटची चेन अडकल्यास तुम्ही ती 3 पद्धतींनी नीट करू शकता. सर्वात आधी ढकलली चेन काढण्यासाठी चिमट्याचा वापर करा. कपड्याचा धागा बऱ्याचदा चीनमध्ये अडकलेले असतो, त्यामुळे चेन पुढे मागे सरकत नाही अडकून जाते.
advertisement
3/7
अशावेळी अडकलेले धागे चिमट्याने हळुवार काढा. जास्त जोरात ओढू नका नाहीतर कपड्यातून खोलवर तो धागा ओढला जाईल आणि कपड्याचं नुकसान होईल. धागा बाजूला केला किक चेन आपसूक मोकळी होते.
advertisement
4/7
चेन बंद केल्यावर पुन्हा लगेच उघडली जात असेल तर चेनच्या स्लायडरचा प्रॉब्लेम असू शकतो. स्लायडर सैल झाल्यावर हा प्रॉब्लेम येतो. अशावेळी चिमट्याने ते स्लायडर हलकेच दाबा. मधेच तपासून पाहा. नाहीतर जास्त दाब बसेल आणि चेन पुन्हा एकाजागी अडकून जाईल.
advertisement
5/7
चेन अडकली असेल आणि वर खाली सरकतच नसेल तर चेनवर पेन्सिलचे टोक हलके हलके घासा. त्यानंतर स्लायडर हळुवारपणे सरकवून पाहा. या पद्धतीनं चेन सहज मोकळी होईल आणि व्यवस्थित उघड बंद होईल.
advertisement
6/7
पेन्सिलऐवजी काही लोक मेणबत्तीचाही वापर करतात. या काही सोप्या पद्धतीनंच वापर करून तुम्ही जॅकेट किंवा जीन्सची अडकलेली चेन मोकळी करू शकता. हे सर्व साहित्यही तुम्हाला तुमच्या घरामध्ये सहज मिळेल.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tricks And Tips : अचानक जॅकेटची चेन अडकलीय? 'या' ट्रिक वापरून पाहा, काही सेकंदात होईल मोकळी..