TRENDING:

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चर्चगेट ते दादर लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार, का आणि कधी?

Last Updated:

Mumbai Local: या ब्लॉकदरम्यान काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत तर काही गाड्या दादर आणि वांद्रे स्थानकांपर्यंतच मर्यादित धावतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईसह उपनगरांतील लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रभादेवी येथील रोड ओव्हर ब्रिजच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेकडून शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रात्री 1:30 ते सकाळी 6 या वेळेत लागू राहणार असून, या कालावधीत चर्चगेट ते दादरदरम्यान उपनगरीय लोकल सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.
Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चर्चगेट ते दादर लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार, का आणि कधी?
Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चर्चगेट ते दादर लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार, का आणि कधी?
advertisement

या ब्लॉकदरम्यान काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत तर काही गाड्या दादर आणि वांद्रे स्थानकांपर्यंतच मर्यादित ठेवून तेथून परत फिरवण्यात येतील. तसेच माटुंगा रोड आणि माहीम या स्थानकांवरही या काळात लोकल सेवा बंद राहणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासाचे योग्य नियोजन करून पर्यायी वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

advertisement

Mumbai Local : मध्य रेल्वेवर तब्बल 10 तासांचा विशेष मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि किती वाजता?जाणून घ्या

प्रभादेवी रोड ओव्हर ब्रिजचे पाडकाम करून त्याठिकाणी आधुनिक दुमजली पूल उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून सप्टेंबर 2025 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र रेल्वे मार्गावरील कामासाठी आवश्यक ब्लॉक वेळेवर न मिळाल्यामुळे काम काही काळ रखडले होते.

advertisement

View More

आता आवश्यक ब्लॉक उपलब्ध झाल्यानंतर गर्डर डी-लाँचिंगचे काम सुरू करण्यात येत असून पाडकाम प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

इथं जम्बो ब्लॉक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
169 वर्ष जुनी पुण्यातली बेकरी, अजितदादांनाही आवडला होता इथला 'हा' पदार्थ, दुबईतही होतो एक्सपोर्ट!
सर्व पहा

वसई रोड ते विरारदरम्यानही शनिवारी रात्री 12:15 ते पहाटे 4:15 या वेळेत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गाड्या जलद मार्गावरून चालवल्या जातील त्यामुळे काही प्रमाणात विलंब होण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चर्चगेट ते दादर लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार, का आणि कधी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल