Apple Cleaning : पाण्याने धुवून सफरचंद खाताय? मग तुम्ही खूप मोठी चूक करताय; खाण्यापूर्वी असं करा साफ
- Published by:Devika Shinde
Last Updated:
खरोखरच सफरचंदावर मेण लावणं धोकादायक असतं का? आणि जर तुम्हाला ते काढून टाकायचं असेल, तर नेमकी योग्य पद्धत कोणती? चला तर मग, यामागचं सत्य आणि काही सोपे घरगुती उपाय जाणून घेऊया.
advertisement
1/12

बाजारात गेल्यावर लालचुटूक आणि काचेसारखी चकाकी असलेली सफरचंदं पाहून आपलं मन मोहून जातं. आपण हौसेने ती घरी आणतो, पण अनेकदा त्यावर नखांनी ओरखडा काढला की पांढऱ्या रंगाचा मेणासारखा पदार्थ बाहेर येतो. बापरे हे तर वॅक्स आहे, यामुळे कॅन्सर तर होणार नाही ना? अशी भीती आपल्या मनात घर करते. सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओंमुळे ही भीती अधिकच वाढली आहे.
advertisement
2/12
पण खरोखरच सफरचंदावर मेण लावणं धोकादायक असतं का? आणि जर तुम्हाला ते काढून टाकायचं असेल, तर नेमकी योग्य पद्धत कोणती? चला तर मग, यामागचं सत्य आणि काही सोपे घरगुती उपाय जाणून घेऊया.
advertisement
3/12
सफरचंदावर मेण (Wax) का लावलं जातं?सफरचंद हे स्वतःच्या संरक्षणासाठी नैसर्गिकरीत्या मेणाचा एक अतिशय पातळ थर तयार करतं, जो त्याला पावसापासून आणि सुकण्यापासून वाचवतो. मात्र, जेव्हा ही फळं बागेतून काढली जातात आणि स्वच्छ धुतली जातात, तेव्हा हा नैसर्गिक थर निघून जातो.
advertisement
4/12
त्यामुळे फळ लवकर खराब होऊ नये, त्याला कुठे जखम होऊ नये आणि ते दीर्घकाळ ताजं राहावं, यासाठी त्यावर फूड-ग्रेड वॅक्सचा (Food-grade wax) एक अतिरिक्त थर लावला जातो. आहारतज्ज्ञ चेल्सी एडवर्ड्स यांच्या मते, हे वॅक्स खाण्यासाठी सुरक्षित असतं आणि यामुळे आरोग्याला धोका नसतो. तरीही, अनेकांना फळावरचा हा कृत्रिम थर आवडत नाही.
advertisement
5/12
सफरचंदावरचं मेण काढण्याचे 5 सोपे मार्गजर तुम्हाला सफरचंद सालीसकट खायचं असेल आणि त्यावरचं मेण काढायचं असेल, तर 'द हंस इंडिया'च्या रिपोर्टनुसार खालील पद्धती प्रभावी ठरतात:
advertisement
6/12
1. उकळत्या पाण्याचा वापरपाणी चांगलं उकळून घ्या आणि एका चमच्याच्या मदतीने सफरचंद काही सेकंद त्यात बुडवून ठेवा. यामुळे मेणाचा थर ढिला होतो. त्यानंतर स्वच्छ कापडाने सफरचंद पुसून घ्या.
advertisement
7/12
2. व्हिनेगरचे द्रावण:व्हिनेगर हे नैसर्गिक क्लिनर आहे. एका मोठ्या भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात एक ते दोन कप पांढरं व्हिनेगर मिसळा. सफरचंद 5 ते 10 मिनिटे यात भिजत ठेवा आणि नंतर हाताने चोळून स्वच्छ पाण्याने धुवा. व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रसही चालेल.
advertisement
8/12
3. बेकिंग सोडा:दोन कप पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळा आणि सफरचंद 15 मिनिटे त्यात ठेवा. बेकिंग सोड्याच्या 'अब्रेसिव्ह' गुणधर्मामुळे मेणाचा थर सहज निघून जातो.
advertisement
9/12
4. मिठाच्या पाण्याचा प्रयोग:एका भांड्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ टाका. सफरचंद काही मिनिटे त्यात घोळवा आणि नंतर ताज्या पाण्याने धुवून वाळवा. ही पद्धत अत्यंत स्वस्त आणि सुरक्षित आहे.
advertisement
10/12
5. बटर नाईफने खरवडणे:जर मेणाचा थर खूप जाड वाटत असेल, तर बटर नाईफचा वापर करा. सफरचंद घट्ट पकडून सुरीने सालावरून हलक्या हाताने खरवडा. लक्षात ठेवा, फक्त वरचा थर निघायला हवा, फळ कापलं जाऊ नये.
advertisement
11/12
प्रत्येक सफरचंदावर वॅक्स असतं का?नाही, सर्वच सफरचंदांवर अतिरिक्त वॅक्स नसतं. विशेषतः सेंद्रिय किंवा स्थानिक बागांमधील सफरचंदांवर असा थर नसतो. मात्र, अशी फळं लवकर खराब होण्याची शक्यता असते.सफरचंदावरील मेण हे शत्रू नाही, पण स्वच्छतेच्या दृष्टीने ते काढून खाणं कधीही चांगलं. वरीलपैकी कोणतीही पद्धत वापरून तुम्ही बिनधास्तपणे सफरचंदाचा आनंद घेऊ शकता.
advertisement
12/12
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Apple Cleaning : पाण्याने धुवून सफरचंद खाताय? मग तुम्ही खूप मोठी चूक करताय; खाण्यापूर्वी असं करा साफ